Pune News: पुणे-नगर महामार्गावर गॅस टँकरचा अपघात; मोठ्या प्रमाणात वायूगळती, धडकी भरवणारा VIDEO

Pune Accident News: पुणे-नगर महामार्गावरील वडगाव शेरी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास गॅस वाहून नेणारा टँकर उलटला. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायूगळती होत आहे.
Pune-Ahmednagar Highway Vadgaon Sheri area Gas Tanker Accident
Pune-Ahmednagar Highway Vadgaon Sheri area Gas Tanker Accident Saam TV
Published On

Pune-Ahmadnagar Highway Accident

पुणे-नगर महामार्गावरील वडगाव शेरी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास गॅस वाहून नेणारा टँकर उलटला. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायूगळती होत आहे. त्यामुळे आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune-Ahmednagar Highway Vadgaon Sheri area Gas Tanker Accident
IMD Rain Alert: राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार; पुढील ३-४ तासांत 'या' जिल्ह्यांना झोडपणार

चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून टँकरवर स्प्रे मारणे सुरू आहे. अपघातानंतर (Accident) महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी (Police) हा रस्ता तात्पुरता सील केला असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून दोन ते तीन तासांचा वेळ लागणार आहे. दरम्यान, टँकरमधून गॅस गळती होत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त टँकर एका गॅस कंपनीचा असून तो पुण्याहून नगरच्या दिशेने जात होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास टँकर वडगाव शेरी चौकालगत आला असता, चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले.

त्यामुळे टँकर रस्त्याच्या मध्यभागी उलटला. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गँस गळती सुरू झाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून टँकरवर स्पे मारणे सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com