Unseasonal Rain: नंदुरबार, हिंगाेलीत मोठी दुर्घटना, चार जणांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू

या घटनेत दाेन महिला जखमी झाल्या आहेत.
unseasonal rain hits maharashtra youth passed away in hingoli and nandurbar
unseasonal rain hits maharashtra youth passed away in hingoli and nandurbarsaam tv
Published On

- सागर निवकडे / संदीप नागरे

Nandurbar News :

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शनिवार रात्री पासून अवकाळी पाऊस (unseasonal rain) झाला. या पावसामुळे अनेक भागात शेतीचे माेठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान हिंगाेली आणि नंदुरबार जिल्ह्यात वीज काेसळल्याने (lightning) दाेघांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

कापूस वेचणीसाठी गेलेल्या मुलीवर काळाचा घाला

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील सपना राजू ठाकरे (वय 14) ही शेतात कामावर असताना तिच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेच तिचा जागीच मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सपना सकाळच्या सुमारास शेतात कापूस वेचणीसाठी गेलेली होती. अवकाळी पावसाचे सावट यार झालेले असताना ढगांचा गडगडाट सुरू झाला. कपाशीच्या झाडाजवळ बसलेल्या सपना हिच्या अंगावर अचानक वीज कोसळली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच दोन महिला देखील जखमी झाल्या. सपना हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शहादा येथे आणण्यात आला.

unseasonal rain hits maharashtra youth passed away in hingoli and nandurbar
Mla Sangram Jagtap: आमदार संग्राम जगताप मंगळवारी बसणार उपाेषणास, प्रशासनास दिला इशारा; जाणून घ्या कारण

वीज काेसळल्याने गोजेगावातील तरुणाचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. मध्यरात्रीपासून कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तूर, कापूस या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. औंढा तालुक्यातील चीमेगाव शिवारात शेतात थांबलेल्या तरुणावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राजेश शंकरराव जायभाये असे मृत तरुणाचे नाव आहे. तो हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोजेगाव मधील रहिवासी हाेत. घरातील कर्ता तरूण गेल्याने कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

Edited By : Siddharth Latkar

unseasonal rain hits maharashtra youth passed away in hingoli and nandurbar
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी निमित्त 30 नाेव्हेंबरपर्यंत घेता येणार विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com