Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : कारवरील नियंत्रण सुटून झाडावर धडकली; तरुणाचा मृत्यू, तीनजण जखमी

Jalgaon News : रविवारी (ता. १४) शिरसोली गावाजवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी कारने गेले होते.

Rajesh Sonwane

जळगाव : सुटीचा दिवस असल्याने चार मित्र हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण केल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले असता रस्त्यावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळली. यामुळे झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेले त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जळगाव (Jalgaon) शहरातील कासमवाडी परिसरात वास्तव्यास असलेला आनंदा शांताराम सोनवणे (वय ३९) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर भैरव भगवान राणे, पप्पू आढाव, योगेश रेंभोटकर हे गंभीर जखमी आहेत. आनंदा व त्याचे तीन मित्र रविवारी (ता. १४) शिरसोली गावाजवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी कारने गेले होते. दरम्यान हॉटेलमध्ये पोटभर जेवण केल्यानंतर चौघेजण कारने शिरसोली रोडवरून जळगाव शहराकडे येण्यासाठी निघाले. दुपारी चारच्या सुमारास देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयापुढे आल्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्याकडेला (Accident) झाडावर आदळली. 

कारने झाडाला धडक दिल्यावर बोनट आणि चेसीस चक्काचूर झाली. या अपघातात आनंदा सोनवणे जागीच ठार झाला, तर कारमधील भैरव राणे, पप्पू आढाव, योगेश रेंभोटकर गंभीर जखमी झाले. वाहन धारक आणि ग्रामस्थांनी चौघांना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढून खासगी वाहनातून जिल्‍हा रुग्णालयात रवाना केले. अपघाताची माहिती कळताच जिल्हा रुग्णालयात मित्रपरिवार व नातेवाइकांनी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT