Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : कारची दुचाकीला धडक; गर्भवती महिलेचा मृत्यू, पतीसह चार वर्षीय बालिका जखमी

Jalgaon News : पत्नी व मुलीसह एरंडोल येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी रविवारी सकाळी गेले होते. नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर दुपारी ते घरी येण्यासाठी निघाले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव शहरात वास्तव्यास असलेले दाम्पत्य नातेवाईकांना भेटण्यासाठी एरंडोलला गेले होते. सर्वांची भेट घेऊन घरी (Jalgaon) येण्यासाठी निघाले होते. मात्र रस्त्यातच भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे रस्त्यावर फेकल्या गेलेल्या गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेच्या पतीसह चार वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. 

दीपाली योगेश कोळी (वय २२) असे (Accident) अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. योगेश गुलाब कोळी (वय २८) हे पत्नी व मुलीसह एरंडोल (Erandol) येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी रविवारी सकाळी गेले होते. नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर दुपारी ते घरी येण्यासाठी निघाले. वराड येथे आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. मागून धडक बसल्याने दुचाकीवरील तिघेजण महामार्गावर फेकले गेले. यात दीपाली कोळी या आठ महिन्याची गर्भवती होत्या. त्या रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  

पतीसह मुलगी गंभीर 

या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला असून दीपाली यांचे पती योगेश व चार वर्षाची मुलगी काव्या हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्वांना जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रवाना केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT