Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : निवडणूक ड्युटीसाठी जाताना अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात; तीन जण जखमी

Jalgaon News : मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र वाटप करण्यात आले असून त्याठिकाणी कर्मचारी आज साहित्य घेऊन रवाना होत आहेत

संजय महाजन

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून याकरिता प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुक ड्युटीसाठी नियुक्त ठिकाणी जात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. 

राज्यात होत असलेल्या (Vidhan Sabha election) विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र वाटप करण्यात आले असून त्याठिकाणी कर्मचारी आज साहित्य घेऊन रवाना होत आहेत. दरम्यान (Jalgaon) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून रावेर येथे मतदान केंद्रावर ड्युटीवर जात असताना मतदार ड्युटीवर नियुक्त अधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाला असून यात एक जण गंभीर तर एक अधिकारी जखमी झाले आहे.

चोपडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल 
यावल तालुक्यातील किनगावजवळ गाडीला अपघात झाला असून  रावेर विधानसभा मतदारसंघातील नियुक्ती असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी रामदास सुलताने, प्राथमिक शिक्षिका ज्योती गोपीचंद भादले, लतीफा परवीन चांद खान यांच्या खाजगी गाडीला अपघात झाला आहे. पुढील उपचाराकरिता सदर महिलांना चोपडा येते हलविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi kadha Recipe: हिवाळ्याच्या दिवसात सर्दी ते खोकल्यापासून होईल सुटका; घरच्या घरी बनवा तुळशीचा काढा

IND vs AUS: पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार?

Garlic Water Benefits: लसणाचे पाणी ठरेल केस गळतीवर रामबाण उपाय

Vinod Tawde: विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई; पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

Solkadhi Recipe: सोलकढी कशी बनवावी? संपूर्ण रेसिपी सोबत फायदे आणि टिप्स

SCROLL FOR NEXT