Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: मुलीचा गणवेश घ्यायला गेलेल्या पित्याचा रस्‍त्‍यातच मृत्यू; दुभाजकावर दुचाकी धडकल्‍याने अपघात

मुलीचा गणवेश घ्यायला गेलेल्या पित्याचा रस्‍त्‍यातच मृत्यू; दुभाजकावर दुचाकी धडकल्‍याने अपघात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुलीचा शाळेचा गणवेश घेण्यासाठी गेलेल्या पित्याचा दुभाजकावर दुचाकी आदळल्याने मृत्यू (Jalgaon) झाला. ही घटना शहरातील महापालिकेसमोर मंगळवारी (ता. २०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास (Accident) घडली. मिलिंद सोमनाथ पवार (वय ४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (Live Marathi News)

जळगावातील शाहूनगर परिसरातील रहिवासी मिलिंद पवार हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मिलिंद पवार मंगळवारी (२० जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या मित्राच्या दुचाकीवरून टॉवर चौकाकडून नेहरू पुतळ्याकडे जात होते. यावेळी अचानक त्यांच्या दुचाकीला अज्ञात दुचाकीचा धक्का लागला. यात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी दुभाजकावरील विद्युत डीपीच्या खांबावर आदळली. या अपघातात डीपीचा लोखंडी खटक्याचा फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे असलेल्या पोलिसांचे चार्ली पथकातील चारुदत्त पाटील आणि भरत पाटील यांनी तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश

दरम्यान, खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) दाखल करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. मृत मिलिंद पवार यांच्या पश्चात आई सिंधूबाई, वडील सोमनाथ पवार, भाऊ मनोज व किशोर, पत्नी सुनंदा आणि तीन मुली असा परिवार आहे. यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, गणवेश घेण्यासाठी आलेल्या मिलिंद पवार यांच्यावर काळाने झडप घातल्याने कुटुंबाचा आक्रोश मन हेलावणारा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT