OBC Reservation Protest Jalna:  Saamtv
महाराष्ट्र

Laxman Hake Hunger Strike: तोडगा नाहीच! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारशी चर्चेस नकार; उपोषणाचा आज सहावा दिवस

Jalana Latest News: काल लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते. मात्र लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे| जालना, ता. १८ जून २०२४

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी जालन्यातील वडुगोद्री येथे उपोषण सुरू केले आहे. काल लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते. मात्र लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओबीसी आरक्षण धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील वडिगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. काल मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, भागवत कराड यांच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली होती.

या भेटीमध्ये सरकारने या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी लक्ष्मण हाके यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते. लक्ष्मण हाके यांनी देखील शिष्टमंडळ मुंबईला जाऊन सरकारशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं होत मात्र लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ सरकारची चर्चा करायला जाणार नसल्याची माहिती स्वतः लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.

दरम्यान, काल सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चेसाठी निमंत्रण दिले होते परंतु त्यानंतर सरकारकडून कोणताही पाठपुरावा केला गेला नाही. तसेच सरकार याबाबत गंभीर दिसत नाही, अशी खंतही लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता या उपोषणावर काय मार्ग निघणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुर्ती, ड्रेस आणि साड्यांवर सुंदर दिसतील शॉर्ट मंगळसूत्र, लेटेस्ट, ट्रेंडी 5 डिझाईन्स

मोठी बातमी! मनोज जरांगेंची निर्णायक आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली, फडणवीसांना काय दिला इशारा?

Diabetes : पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणा मधुमेहींसाठी घातक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढेल

Cyber Crime : '1930' सायबर हेल्पलाइनच ठरली फसवणुकीचे हत्यार; खाती गोठवून लाखोंची खंडणी, आरोपी गजाआड

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावात अन्न औषध प्रशासन विभागाची धाड

SCROLL FOR NEXT