Laxman Hake Hunger Strike Jalna:  Saamtv
महाराष्ट्र

Laxman Hake Hunger Strike: 'मनोज जरांगेंना रेडकार्पेट अन् आमच्या उपोषणाची दखलही नाही', ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी खदखद मांडली

Laxman Hake Hunger Strike Jalna: आज खासदार संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतरही हाके यांनी उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले आहे.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे, जालना|ता. १७ जून २०२४

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्याच्या जालन्यातील वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी त्यांनी या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचे सांगत राज्य सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

"राज्याचे शासन आणि महाराष्ट्रातील सर्वच नेते म्हणताय की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर कसा लागत नाही याचं आम्हाला राज्य शासनाकडून लेखी प्रमाणपत्र पाहिजे. ओबीसींना कळत नाही असं शासनाने समजू नये. आमचा समाज शांती प्रिय आहे, आम्ही सामाजिक तेढ निर्माण करत नाही," असे लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.

तसेच "जरांगे साहेब गेली सात- आठ महिने सांगत आहेत की ओबीसी आमचा भाऊ आहे आमच्यात भाईचारा दुसरीकडे ते ओबीसी नेत्यांना ते टार्गेट करताना दिसतात. मनोज जरांगेंना शासनामार्फत रेड कार्पेट अंथरले जाते. मात्र आम्ही उपोषण करतो तेव्हा शासनाकडून साधी दखलही घेतली जात नाही. हाच फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का?" असा सवालही लक्ष्मण हाके यांनी विचारला.

दरम्यान, आज खासदार संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. मात्र लक्ष्मण हाके आमरण उपोषणावर ठाम आहेत. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगावं आम्ही उपोषण सोडायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया हाकेंनी दिली. उद्या लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्यासासाठी मुंबईला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

General Knowledge: व्यक्तीच्या शिंकण्याचा वेग किती असतो?

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आमदार, महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांचा रिक्षाने एकत्रित प्रवास

Ajit Pawar: महायुती सरकार धारावी पुनर्विकास करूनच दाखवणार- अजित पवार|VIDEO

शाहजहाँने दिल्लीमध्येच का बनवला लाल किल्ला?

Raigad News: दरडग्रस्तांचं पुनर्वसन रखडलं; 44 कुटुंबांचा स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT