OBC Reservation Protest Jalna:  Saamtv
महाराष्ट्र

Laxman Hake Hunger Strike: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली! पाण्याचा त्याग, उपचारासही नकार; आज सरकारचे शिष्टमंडळ भेट घेणार

OBC Reservation Protest Jalna: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे| जालना, ता. १७ जून २०२४

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस असून लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे. तसेच त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी सरकारचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. खासदार संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड हे सकाळी 9.30 वाजता उपोषणकर्त्यांशी बातचीत करणार आहे.

आज आंदोलक हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांनी कालपासून पाणी देखील बंद केले आहे. काल त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र हाके यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला होता. दरम्यान, सरकारचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांचे आमरण उपोषण सोडवण्यात यशस्वी होत का हे बघणं महत्त्वाच असणार आहे.

दरम्यान, काल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही उपोषणस्थळी भेट दिली होती. यावेळी त्यांनी सगेसोयऱ्यांचा जीआर काढणाऱ्यांचे आमदार पाडणार असा थेट इशारा राज्य सरकारला दिला होता. तसेच हे ओबीसी आंदोलन राज्यभरात सुरू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT