Jalana Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Jalna Breaking News: धनगर बांधवांच्या मोर्चाला हिंसक वळण; जालना जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

Jalana Breaking News: आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांकडून जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalana Dhangar Reservation Protest:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरु लागली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांकडून जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला हिंंसक वळण लागल्याचे समोर आले असून आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच परिसरातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी (Dhangar Reservation) जालन्यात धनगर समाजाकडून महामोर्चा काढण्यात आला. गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभाही घेण्यात आली. मात्र निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न दिल्याने मोर्चेकरांनी मोठा गोंधळ केला.

आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर धनगर बांधव सहभागी झाले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना अडवण्यात आले. ज्यामुळे संतप्त आंदोलकांनी गेटवरुन चढून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोर्चेकरांकडून परिसरातील दुचाकींसह उपजिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली.

ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, यावेळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप परिस्थिती नियंत्रणात आणली. आक्रमक मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी पांगवल्यानंतर परिस्थिती पुर्वपदावर आली. यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामाविष्ट केलं नाही; तर सरकारला सत्तेवरून खाली खेचू असा इशाराही यावेळी देण्यात आला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Shani Yuti: दिवाळीपूर्वी शनी-शुक्र बनवणार दुर्मिळ संयोग; करियर आणि बिझनेसमध्ये होणार लाभ

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT