Maratha Reservation Update Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation: ब्रेकिंग! जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

Maratha Aarskshan News: जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोकरदनमध्ये 70, हसनाबाद 15, बदनापूरमध्ये 100 पेक्षा अधिक, परतूरमध्ये 9 तर अंबडमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लक्ष्मण सोळुंके

Maratha Reservation Protest:

सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. काल (२४, फेब्रुवारी) मराठा समाजाकडून जिल्ह्या जिल्ह्यात रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला होता. अशातच जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.

काल मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणसाठी मराठा बांधवांकडून जिल्ह्याजिल्ह्यात रास्तारोको करण्यात आला होता. या रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोकरदनमध्ये 70, हसनाबाद 15, बदनापूरमध्ये 100 पेक्षा अधिक, परतूरमध्ये 9 तर अंबडमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनोज जरांगेंच्या (Manoj jarange Patil) आदेशानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. काही भागात आंदोलक आणि पोलिसांत धक्काबुक्की झाल्याचेही प्रकार बघायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीचे उल्लंघन आणि हुल्लडबाजी केल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांनी सरकारकरच्या आदेशानुसार हे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप करत मराठा आंदोलकानी सरकारचा जाहीर निषेध केला आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Orry Funny Video: 'आज मी या महिलेला रस्त्यावर पैसे मागताना...'; उर्वशी रौतेलासोबत मजा करताना दिसला ओरी, VIDEO व्हायरल

Nashik Ring Road : नाशिकमधील वाहतूककोंडीची कटकट संपणार, ६६ किमीचा रिंग रोड, ८,००० कोटींचा प्रोजेक्ट कसा असेल?

Maharashtra Live News Update : छावा संघटनेचे विजय घाडगे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० येणार? नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Makyachi Bhakri Tips: मक्याची भाकरी जमतच नाही? थापताना तुटते, फुगतच नाही? १ सोपी ट्रिक, मऊ भाकरीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT