Jaipur Mumbai Express Firing Saam Tv
महाराष्ट्र

Jaipur Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरण; दोन आरपीएफ जवान सेवेतून बडतर्फ

Jaipur Mumbai Express Firing Case Eyewitness: जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. एक्सप्रेसमधील गोळीबाराचे प्रत्यक्षदर्शी असलेले दोन्ही आरपीएफ जवान सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहेत.

Rohini Gudaghe

Sachin Gaad

Jaipur Mumbai Express Firing Case Update

३१ जुलै २०२३ रोजी जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Mumbai Express) पहाटे पावणे सहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. आरपीएफ जवान चेतन सिंहने ३१ जुलैला आपल्या सहकाऱ्यासह प्रवाशांवर गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये आरपीएफ जवानासह ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. काहीजण गंभीर जखमी झाले होते.  (latest marathi news)

ही घटना दहिसर ते मीरारोड रेल्वे स्थानकांदरम्यान घडली होती. घटनेनंतर लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवली. त्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली (Jaipur Mumbai Express Firing Case) होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रत्यक्षदर्शींवर मोठी कारवाई

आता या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येत आहे. जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणाचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या दोन्ही आरपीएफ जवानांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं (Eyewitnesses RPF Jawans Suspended) आहे. कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या दोघांची सविस्तर चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरपीएफ जवान अमेय आचार्य आणि नरेंद्र परमार यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. हे दोन्ही जवान एक्सप्रेसमधील गोळीबाराचे प्रत्यक्षदर्शी होती. कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात (RPF Jawan) आली आहे. सविस्तर चौकशीअंती या दोघांना बडतर्फ करण्यात आलं आहे. कर्तव्य चोखपणे बजावलं नाही, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

एक्सप्रेसमधील प्रवाशांवर गोळीबार

प्रवाशांवर गोळीबार होत असताना एक जवान एक्सप्रेसमधील टॉयलेटमध्ये लपून बसला होता, तर दुसऱ्याने कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली होती, असा ठपका दोघांवर ठेवण्यात आला (Firing) आहे. ३१ जुलैला एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारात आरपीएफच्या एएसआयसह तिन प्रवाशांची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंह अटकेत आहे.

आरोपी चेतन सिंहचे मानसिक संतुलन बिघडलं (Jaipur Mumbai Express Firing) होतं. यासाठी तो गेल्या ६ महिन्यांपासून उपचार घेत असल्याचे देखील चौकशीतून समोर आलं होतं. आता आरोपीची मनोवैज्ञानिक चाचणी केली जाणार होती. आरोपीने पोलिसांना तपासामध्ये सहकार्य केलं नसल्याची माहिती समोर आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT