Jain Monk Nileshchandra Vijay addressing a religious gathering while making strong political remarks ahead of civic elections. Saam Tv
महाराष्ट्र

जैन बांधव शिवसेनेसोबत, फडणवीसांच्या जवळ गद्दार नेते

Marwadi-Marathi Tension: कबुतरखान्यावरुन मारवाडी-मराठी असा वाद ताजा असतानाच जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट शिंदे सेनेची बाजू घेऊन भाजपवर प्रहार केलाय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जैन मुनींची टीका भाजपला अस्वस्थ करणार आहे. जैन बांधव कोणत्या पक्षाकडे झुकणार?

Girish Nikam

अमराठी व्यापा-याला मारहाण केल्यामुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय-सामाजिक वातावरण काही महिन्यांपूर्वी ढवळून निघालं होतं. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर परप्रांतीयांची भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच जैन मुनी निलेशचंद्रांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर शिंदे सेनेचं मात्र कौतुक केलंय. एका सत्संग कार्यक्रमात जैन बांधवांना काय आवाहन केलंय पाहा...

मारवाडी किंवा जैन बांधवांना हात लावला तर जशास तसे उत्तर मिळेल असा इशारा देतानाच त्यांनी मीरा-भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि आमदार गीता जैन यांना बनावट वाघ-वाघीण म्हणत निशाणा साधलाय. मारवाडी किंवा जैन समाज शिवसेनेसोबत असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

कबुतरखान्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या जैन मुनींनी मराठी विरुद्ध मारवाडी या वादात उडी घेत यापूर्वी भाजपमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरुद्धही आक्रमक भूमिका घेतली होती. इतकच नाही तर त्यांनी कबुतरांच्या मुद्द्यावरुन शांतीदूत जनकल्याण पार्टीचीही घोषणा केलीय. अहिंसा हाच धर्म मानणारा जैन समाज आहे. मात्र जैन मुनींची भूमिका रोखठोक आहे. आक्रमक आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पालिका निवडणुकीत जैन समाज खरंच शिंदे सेनेकडे झुकणार का? की भाजपलाच पसंती देणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT