jackie shroff  Saam tv
महाराष्ट्र

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

jackie shroff news : जॅकी श्रॉफ यांनी सांगलीतील वृक्षरोपन सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याला जॅकी यांनी उपस्थितांना मोलाचा संदेश दिला.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगलीच्या गार्डी येथील वृक्षरोपण सोहळ्याला जॉकी श्रॉफ यांची हजेरी

जॉकी श्रॉफ यांनी उपस्थितांना दिला मोलाचा संदेश

जॅकी श्रॉफ यांची कार्यक्रमाला बैलगाडीतून एन्ट्री

सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या गार्डी येथे अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून ट्री आर्मी उपक्रम सुरू करण्यात आला. यावेळी स्वतः जॉकी श्रॉफ यांनी खड्ड्यात बसून वृक्षारोपण केलं. विशेष म्हणजे वृक्षारोपण सोहळ्यासाठी जॅकी श्रॉफ बैलगाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. तसेच उपस्थितांना मोलाचा संदेश दिला.

'सांगलीच्या गार्डी परिसरात साडेचार हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून वृक्षारोपण करून आपण कुणावर उपकार करत नाही. ही भावना प्रत्येकाने ठेवून झाडे लावली पाहिजे, असं मत अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच 'फुले दिले की फुलेच मिळतात, दगड दिले की दगडच मिळते. त्यामुळे कुणी टीका केली, तर शांत राहायचं. कुणाचे पाय कापून तर आपण उंच होणार नाही, असा संदेश जॅकी श्रॉफ यांनी दिला.

या वृक्षरोपण सोहळ्यात जॅकी श्रॉफ यांनी आमदार सुहास बाबर यांचे कौतुक केलं. सुहास बाबर म्हणजे पिंपळाच्या झाडासारखा सळसळता उत्साह आहे. त्याला वाढविण्याची, जपण्याची आणि पाणी घालण्याची जबाबदारी आपली आहे, अशा शब्दात जॅकी श्रॉफ यांनी सुहास बाबर यांच्या कार्याचं कौतुक केलं.

जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले, 'पृथ्वी आई आहे. त्यामुळे पृथ्वीचं संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत. बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याइतकी झाडे लावण्याचा संकल्प केला होता. आता पुढील दोन वर्षांत ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जॅकी श्रॉफ यांच्या सहभागामुळे या मोहिमेला राष्ट्रीय ओळख मिळणार आहे. विट्यातून सुरू झालेली ट्री आर्मी आता देशभर आणि जगभर पोहोचेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT