IT Raid: आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच दिनू गावित
महाराष्ट्र

IT Raid: आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच

नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर गेल्या 56 तासांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे तपासणी सुरु आहे.

दिनू गावित

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर aayan Multitrade Sugar Factory गेल्या 56 तासांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे तपासणी सुरु आहे. कारवाईचा आज तिसरा दिवस असून गेल्या दोन दिवसात नेमकी काय कारवाई झाली याबद्दल अद्यापही कारखाना प्रशासन व आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे बोलण्यास नकार दिलेला आहे.

हे देखील पहा-

त्यामुळे नेमकी काय कारवाई होत आहे याबाबत अस्पष्टता आहे. 1996 साली पुष्प दंतेश्वर साखर कारखाना नावाने समशेरपुर परिसरात या कारखान्याची निर्मिती झाली. त्यावेळी 1200 मॅट्रिक टन दिवसाला गाळप क्षमता होती. 2014-15 साली हा कारखाना अवसायानात गेल्याने कारखान्याची विक्री झाली होती.

150 कोटीहून अधिक किंमतीची मालमत्ता असलेला कारखाना फक्त 47 कोटी मध्ये पुणे येथील ऑस्ट्रेरीया ऍग्रो कंपनीला विकला गेला. याबाबत त्यावेळी आरोप झाले होते. हा कारखाना खरेदीसाठी पुणे मध्यवर्ती बँकेने कोट्यवधींचे कर्ज देखील वितरीत केले होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी या साखर कारखान्याला आयान मल्टीट्रेड एलएलपी असे नाव देण्यात आले आहे.

सचिन शृंगारे नामक व्यक्तीच्या नावावर हा कारखाना असून सदर व्यक्ती पार्थ पवारांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. गेल्या तीन दिवसापासून सदर कारखान्यावर आयकर विभागाने धाड टाकली असून मोठ्याप्रमाणावर कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Edited by-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT