CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना फक्त मत मिळवण्यासाठी नाही, विरोधकांवर मुख्यमंत्री शिंदे बरसले

CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

Saam Tv

संभाजी थोरात, साम टीव्ही, प्रतिनिधी

''लाडकी बहीण योजना कधीच बंद पडणार नाही, ही कायम स्वरूपी योजना आहे, फक्त मत मिळवण्यासाठी नाही'', असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. आज पाटण मतदारसंघातील विकासकामांच्या भूमिपूजन लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, ''माझ्या जन्मभुमीत कार्यक्रमाला येतो, त्यावेळी आनंद होतो. आम्ही ज्यावेळी उठाव केला, त्यावेळी शंभूराज देसाई माझ्या खांद्याला खांदा लावून उभा होता. आपलं राज्य गुतवणूकमध्ये 1 नंबरला आहे. जेव्हा आपली सत्ता नव्हती, त्यावेळी राज्य तीन नंबरवर होतं.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ''सिंधुदुर्गमध्ये भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करू, येणाऱ्या शिवजयंतीला आपण त्याच लोकार्पण करू.'' ते म्हणाले, शेतकऱ्यांना साडेसहा हॉर्स पावरपर्यत वीज मोफत देण्यात येणार आहे.''

शिंदे म्हणाले, ''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा विरोधक टीका करत होते. ही योजना फसवी आहे म्हणून, मात्र हा एकनाथ शिंदे आहे, महायुतीच सरकार आहे, जे बोलतो ते करतो. हे देणारं सरकार आहे. माझ्या लाडक्या बहिणांना पैसे मिळू नये म्हणून काही जण कोर्टात गेले. त्या सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा.''

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ''बदलापूरची घटना घडली त्यावेळी त्या नाराधमाला फाशी द्या, असे विरोधक म्हणत होते. आता त्या आरोपीने पोलिसांवर हल्ला केला, म्हणून त्याचा एन्काऊंटर केला, तर हे पुन्हा आरोप करत आहेत. ही विरोधकांची दुट्टपी भूमिका आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भारताला तर पाकिस्तानही हरवेल...' टीम इंडियावर Wasim Akram ची जहरी टीका

Chandra Gochar 2024: 'या' ३ राशींचा गोल्डन टाईम संपला; चंद्राच्या गोचरमुळे अडचणीत होणार वाढ

Homemade Snacks Quick Recipe: पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलाय? मग नाश्त्याला 'या' युनिक रेसिपी नक्की ट्राय करा

UP Madrasa Act : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UP मदरसा अ‍ॅक्टला मान्यता, 17 लाख विद्यार्थ्यांना दिलासा

HBD Virat Kohli: महागड्या गाड्या, अलिशान घर; दिवसाला कमावतो 5 कोटी! विराटची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT