वाळवा तालुक्यातील कुरळप मधील मिनाई आश्रमशाळेतील असहाय अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी संस्थाचालकासह दोघांना चार वेळा जन्मठेपेची शिक्षा इस्लामपूर (islampur) येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी ठोठावली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संस्थाचालक अरविंद आबा पवार (वय ६६) आणि सहायक कर्मचारी मनिषा चंद्रकांत कांबळे (वय ४३, दोघे रा. कुरळप) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Maharashtra News)
पाच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१८ मध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्रावरून या अत्याचाराच्या घटनेची पोलीसांनी पोलखोल केली. त्यांनतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
त्यावेळी मिनाई आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार आणि शाळेतील सहायक कर्मचारी मनीषा कांबळे अशा दोघांना पोलिसांनी अटक केली हाेती. या दोघांविरुध्द इस्लामपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
न्यायालयात पीडित मुलींच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून न्या. ए. एस. गांधी यांनी चार पिडीतांच्या तक्रारीमध्ये चार वेळा जन्मठेप व दंड अशी शिक्षा सोमवारी ठोठावली. चार जन्मठेपेची शिक्षा एकाचवेळी आरोपींना भोगावी लागणार आहे असे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.
दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमातून दोघांची न्यायालयाने मुक्तता केली अत्याचारित चार पीडित मुलींना प्रत्येकी ५० हजार तर विनयभंग झालेल्या दोन पीडित मुलींना प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाच्या रकमेतील नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत असे वकीलांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.