Khalapur Irshalgad Landslide saam tv
महाराष्ट्र

Raigad Irshalwadi landslide: जिथून आवाज येत होता, तिथे जाऊन शोधत होतो... दरड कोसळ्यानंतर सर्वात आधी पोहोचलेल्या तरुणांनी सांगितली भयावह परिस्थिती

Landslide in Irshalwadi village: या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 ते 30 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाडील अडकले असण्याची भीती आहे.

Chandrakant Jagtap

Khalapur Irshalgad Landslide: रायगडच्या खालापूरमध्ये इर्शाळवाडी येथे काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून अख्ख गाव मलब्याखाली दबल्याची घटना घडली आहे. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 ते 30 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाडील अडकले असण्याची भीती आहे. इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्यानंतर सर्वात आधी पोहोचून ज्या तरूणांनी मदत केली, त्यांनी तेथील भयावह परिस्थिती सांगितली आहे.

साम टीव्हीशी बोलताना यातील एका तरुणाने सांगितले की, ही अत्यंत दूर्दैवी घटना आहे. याठिकाणी दरड कोसळी आहे आणि जवळपास 50 फुटांचा मलबा घरांवर साचलेला असू शकतो. घटनेविषयी कळताच आम्ही निघालो येथे जायला खूप कठीण होतं तरी आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचलो तेव्हा खूप धुकं होतं, त्यामुळे आम्हाला सकाळपर्यंत थांबावं लागलं. तिथे जाईपर्यंतच आमच्याकडील बॅटरी संपल्या होत्या.

तिथे पोहोचल्यावर आम्ही सर्वात आधी आवाज कुठून येतोय हे पाहिलं. सुरुवातीला एका बकरीचा जीव आम्ही वाचवला. ती मबल्याखाली दबली होती. त्यानंतर एक छोटा मुलगा होता, जो घराच्या किचनमध्ये अडकला होता. त्यालाही आम्ही सुखरुप बाहेर काढलं. त्यानंतर एक मृतदेहही काढला. (Landslide in Irshalwadi village)

दुसऱ्या एका तरुणाने सांगितले की, आम्ही रात्री साडेबारावाजता येथे पोहोचलो. आमचा पूर्ण ग्रुप साडेबारापर्यंत याठिकाणी पोहोचला. जेव्हा घटनेविषयी समजलं तेव्हा 20 ते 25 तरुणांनी धाव घेतली. काही लोक शाळेत बसली होती, त्यांनीही धाव घेतली. एका बाळाला वाचवण्यात आम्हाला यश आलं असं या तरुणाने सांगितलं. (Raigad Irshalwadi landslide)

इर्शाळवाडी येथे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: तिथे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदतीची घोषणा केली आहे. तसेच जखमी लोकांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT