Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवलेली लाखाे रुपयांची ठेव बुडणार या धास्तीने मानसिक तणावातून एका ठेवीदाराचा मृत्यू झाला. या पतसंस्थेचा आर्थिक घाेटळा उघडकीस आल्यानंतर यापुर्वी एका ठेवीदाराने आत्महत्या केली हाेती. आता मानसिक तणावातून एका ठेवीदाराचा मृत्यू झाल्याने संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)
छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श पतसंस्थेत (adarsh nagari sahakari patsanstha) 200 कोटींचा घोटाळा झाल्यानंतर हजारो ठेवीदार सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. भानुदास उकर्डे यांनी आदर्श बँकेत 27 लाख 50 हजार रुपयांची ठेव ठेवली आहे. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबियांची जवळपास एक कोटी रुपयांची ठेव बँकेत आहे.
जिल्ह्यातील करमाड येथील आदर्श बँकेत शेतकऱ्यांनी डीएमआयसी आणि समृद्धीमध्ये गेलेल्या शेतीचा पैसा मोठ्या व्याजाच्या आमिषाने ठेवी म्हणून ठेवलेले कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत.
भानुदास उकर्डे यांनी आदर्श बँकेत 27 लाख 50 हजार रुपयांची ठेव ठेवली आहे. ठेवीची मुदत संपल्यानंतर बँकेचा घोटाळा समोर आला. त्यानंतर पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे असे वाटत असताना भानुदास उकर्डे यांचा 12 ऑगस्ट रोजी रक्तदाब वाढून मृत्यू झाला.
यापूर्वी लाडगाव येथील तरुण शेतकरी रामेश्वर नारायण इथर यांचेही २२ लाख रुपये आदर्श बँकेत अडकल्याने महिनाभरापूर्वी त्यांनी आत्महत्या केली होती. आता भानुदास उकर्डे यांच्या निधनामुळे आदर्श घोटाळ्यातील हा दुसरा बळी ठरला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.