देशात सडक्या सुपारीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट; 15 हजार कोटींची उलाढाल Saam Tv
महाराष्ट्र

देशात सडक्या सुपारीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट; 15 हजार कोटींची उलाढाल

देशात सडक्या सुपारीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याची माहिती पुढे आली आहे. या सडक्या सुपारीत देशात 15 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय डाफ

नागपूर : देशात सडक्या सुपारीचे Nutmeg आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याची माहिती पुढे आली आहे. या सडक्या सुपारीत देशात 15 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. नुकतेच सीबीआयने CBI देशभरात 19 ठिकाणी सुपारी व्यापाऱ्यांवर छापे टाकल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे. दुसरे म्हणजे या सडक्या सुपारीमुळे अनेकांना कॅन्सर Cancer सारख्या आजाराने ग्रासले आहे. सीबीआयच्या छाप्यामुळे सुपारी व्यापाऱ्यांचे धागे मात्र दणाणले आहे.

सडक्या सुपारी संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका प्रलंबित आहे. भारतात अवैधपणे सडकी सुपारी आयात केली जात असल्यामुळे सी. के. इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. एम. के. चिंतनवाला यांनी २०१६ मध्ये नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. सडकी सुपारी रोड आणि अन्य मार्गाने भारतात आणली जाते.

हे देखील पहा -

अशी सुपारी बाजारात सर्रास विकली जात असल्यामुळे कर्करोग आणि अन्य गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे. याशिवाय छुप्या पद्धतीने सुपारी आयात केली जात असल्यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

न्यायालयाने 10 ऑक्टोबर 2018 रोजी या प्रकरणाचा तपास 'सीबीआय'कडे हस्तांतरित केला आहे. त्यापूर्वी डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सद्वारे प्रकरणाचा तपास केला जात होता. न्यायालयाच्या आदेशानुसार 'सीबीआय'ने या प्रकरणात कारवाई करणे सुरू केले आहे.

या सडक्या सुपारीचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो आहे. या सडक्या सुपारीमुळे कँसर सारखे घातक आजार होतो. त्याशिवाय तोंडाचे आजार, पोटाचे आजार या सुपरीमुळे होतो. अनेकांचे आयुष्य या सडक्या सुपरी मुळे उध्वस्त झाले आहे.

सडक्या सुपारीचा गोरखधंदा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे तसेच सरकारला कराच्या रुपात कोट्यवधींचा फटका देणारे मोठमोठे सुपारी तस्कर देशभरात आहे. त्यांचे धागेदोरे देशातील विविध प्रांतात जुळले आहे. यात स्थानिक पोलीस आणि कस्टमच्या अधिकऱ्यांचही हात असल्याचे संशय आहे. त्यामुळे सडक्या सुपारीची तस्करी करणाऱ्यांवर वचक ठेवण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

SCROLL FOR NEXT