Ajit pawar  Saam TV
महाराष्ट्र

मदत करतोय सांगण्यापेक्षा ती कृतीत उतरवा; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला सल्ला

विरोधी पक्षनेते अजित पवार आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार आज गडचिरोली आणि चंद्रपूर (Gadchiroli and Chandrapur) जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला सांगण्यात आलं की विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. धरणाच्या बॅक वॉटर मुळे रस्ते बंद झाले आहेत.

शेतकऱ्यांचा (Farmer) शेतामध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे दुसऱ्यांनी सांगीतले म्हणूण विश्वास न ठेवता मी स्वतः पाहिल्यावर सगळी परिस्थीत जाणून घेणार आहे. त्यानंतर सगळे विरोधक बसून सभागृहात प्रश्न मांडणार आहोत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मदत करतोय म्हणून सांगितलं, पण ते कृतीत उतरवायला पाहिजे असं ते यावेळी म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

एकीकडे पावसाळ्यात शेतकरी आत्महत्या करत नाही. मात्र, आज ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याना सरळ मदत करावी अशी मागणी अजिद पवार यांनी यावेळी केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणार; गणेश मंडळ उद्योगपतींकडून हॅकजॅक, मनसेचा आरोप

Thane crime : ठाण्यात गुंडांची दहशत, प्रसिद्ध डॉक्टरांच्या दवाखान्याची तोडफोड, व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT