Sakshi Sunil Jadhav
सध्या सोशल मीडियावर अनेक सनस्क्रीनचे पर्याय उपलब्ध होत आहेत. त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन खूप फायद्याची असते असं अनेकांनी सांगितलं आहे.
लोक सुंदर दिसण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी महागड्या सनस्क्रीनचा किंना स्किनकेअरचे प्रोडक्ट्स विकत घेतात.
महत्वाचा प्रश्न म्हणजे सूर्यप्रकाशातून शरीरात तयार होणाऱ्या व्हिटॅमिन D वर सनस्क्रीनचा परिणाम होतो का? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. पुढे आपण याचं उत्तर जाणून घेणार आहोत.
सनबर्न, टॅनिंग, डार्क स्पॉट्स आणि त्वचेचे कॅन्सर टाळण्यासाठी लोक बाहेर पडताना सनस्क्रीन लावतात. असं बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलेलं आहे.
सूर्याच्या UVB किरणांमुळे त्वचेत असलेले कोलेस्टेरॉल व्हिटॅमिन D मध्ये रूपांतरित होतं.
सनस्क्रीन UVB किरणे अंशतः रोखतात, त्यामुळे व्हिटॅमिन D निर्मिती कमी होते, अशी भीती व्यक्त अनेकांच्या मनात असते.
बरीच मंडळी लोक सनस्क्रीन योग्य प्रमाणात किंवा रोजच्या रोज वापरत नाहीत. त्यामुळे UVB पूर्णपणे ब्लॉक होत नाहीत.
ऑस्ट्रेलियात केलेल्या एका अभ्यासानुसार अधूनमधून सनस्क्रीन वापरल्याने व्हिटॅमिन D ची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत नाही.
जास्त वेळ घरात राहणं, सकाळच्या उन्हाचा अभाव, प्रदूषण, गडद त्वचा, वाढते वय, आहारात व्हिटॅमिन D ची कमतरता यामुळेच तुम्हाया या व्हिटॅमिनची कमी भासते.
सनस्क्रीन न लावणाऱ्या व्यक्तींमध्येही व्हिटॅमिन D ची कमतरता दिसून येऊ शकते. बराच वेळ उन्हात राहायचं असेल तर सनस्क्रीन वापरणं आवश्यक आहे. यामुळे त्वचेचं नुकसान टाळता येतं.
सकाळच्या सौम्य उन्हात काही वेळ घालवा. अंडी, मासे, दूध यांसारखे व्हिटॅमिन D युक्त पदार्थ खा. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्या. पण एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.