Inspiring Story Saam TV
महाराष्ट्र

Inspiring Story : मानलं भावा! घरी हालाखीची परिस्थिती असूनही मागे हटला नाही; पहिल्याच प्रयत्नात ४ स्पर्धा परीक्षा केल्या पास

Latur Inspiring Story : स्पर्धेच्या युगातही अनेक विद्यार्थी हालाखीच्या परिस्थितीही यशाला अशी काही गवसणी घालतात की ते अनेकांसाठी आदर्श बनतात. लातूरमधील अशाच एका पठ्ठ्याने आपल्या यशाने साऱ्यांनाच थक्क केलं आहे.

Ruchika Jadhav

सरकारी नोकरी मिळणं सध्याच्या काळात फार कठीण गोष्ट झाली आहे. प्रत्येकाला नोकरी मिळवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागतेय. स्पर्धाही मोठ्या-प्रामाणात वाढल्या आहेत. या स्पर्धेच्या युगातही अनेक विद्यार्थी हालाखीच्या परिस्थितीवर मात करत यशाला अशी काही गवसणी घालतात की ते अनेकांसाठी आदर्श बनतात. लातूरमधील अशाच एका पठ्ठ्याने आपल्या यशाने साऱ्यांनाच थक्क केलं आहे.

नरसिंह जाधव असं या पठ्ठ्यांचं नाव. त्याने सरकारी नोकरीसाठी चार परीक्षा दिल्या आणि चारही परीक्षेत तो पास झालाय. मूळचा लातूरचा रहिवासी असलेल्या नरसिंहचे वडील टेलरिंगचे काम करतात. लातूरमधून प्राथमिक शिक्षण घेऊन निरसिंहने सिंहगड कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं.

नरसिंहने आधी सिव्हील इंजिनिअर असिस्टंटची परीक्षा पास केली आणि परभणीत रुजू झाला. आता यावरच तो थांबला नाही. त्याच्या मनात यशाची भूक फार मोठी होती. त्यामुळे त्याने डिसेंबर २०२३ मध्ये पालघर जिल्हा परिषदेसाठी ज्युनियर इंजिनिअर, सिव्हील इंजिनिअर आणि राज्याच्या जलस्त्रोत विभागासाठी परीक्षा दिली होती.

या तिनही परीक्षा नरसिंह पास झालाय. असे असले तरी नरसिंहेचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाहीये. नरसिंहला क्लास वन अधिकारी व्हायचंय. म्हणून यापुढेही त्याने अभ्यास सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अभ्यासाठी त्याने घेतलेली मेहनत सर्वजण पाहत आहेत. तसेच नरसिंहेचं हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी त्याचे वडील रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आतापर्यंत त्याने जे यश मिळवलं त्यात त्याच्या कुटुंबियांचा देखील मोलाचा वाटा असल्याचं नरसिंह स्वत: सांगतो. आता तो क्लास वन अधिकारी केव्हा होणार याची कुटुंबीय वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: मध्यरात्री भयंकर घडलं! इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ३ कामगार पडले, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update : पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

SCROLL FOR NEXT