- संजय राठोड
यवतमाळ : 'शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे,जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही' या वाक्याला सार्थ ठरवलंय यवतमाळ (Yavatmal) मधील अत्यंत गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या शेतमजुरांच्या मुलींनी. सदैव पुस्तकात डोळे खुपसून राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलींचा डाॅक्टरकीला प्रवेश मिळालाय.
हे देखील पहा :
एकीकडे विदर्भातील (Vidarbha) एका गावात दलित वस्तीचा पाणीपुरवठा खंडित केल्याचे प्रकरण ताजे असताना दुसरी कडे मात्र त्याच एका दलित कुटुंबातील दोन रमाईच्या मुलींनी सकारात्मक उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. अजूनही ग्रामीण भागात आणि दलित समाजात मुलींच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. मात्र, या दोन्ही मुलींनी समाजापुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
यवतमाळच्या आर्णी (Arni) तालुक्यातील लोनबेहल येथील कांबळे परिवारात दोन भावांच्या मुलींचा नंबर डाॅक्टरकी साठी लागल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाने मोलमजुरी करून व दुसर्या भावाने एक एकर जमीन विकून आपल्या मुलीला शिकवून डॉक्टर बनविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतीक्षा भगवंत कांबळे हिचा एमबीबीएस (MBBS) करिता अकोला (Akola) येथे नंबर लागला आहे. भगवंत कांबळे यांनी प्रतीक्षा करिता एक एकर जमीन विकून तिला शिकवलं! मात्र, त्याचंच आता चीज झालं असून प्रतिक्षाचं अकोला येथे एमबीबीएस साठी ऍडमिशन झालं आहे.
तर, सुनिता सूर्यकांत कांबळे या विद्यार्थिनीचा बीएएमएस (BAMS) करिता नांदेड (Nanded) येथे नंबर लागला आहे. सूर्यकांत कांबळेंनी मोलमजुरी करून मुलगी सुनिता ला शिकवलं. विशेष म्हणजे सूर्यकांत कांबळे आणि भगवंत कांबळे हे दोन्ही भावंड एकाच मोडक्या घरात राहतात. छोट्याशा घरात दोन्ही भावाच्या मुली सुनिता आणि प्रतिक्षा ह्या एकाच खोलीत अभ्यास करत असतात. दोघींचा देखील डाॅक्टरकी साठी नंबर लागलाय. लोनबेहल येथील या दोन्ही सख्ख्या भावाच्या मुली आहेत.
मुलींच्या या यशाने या दोघा भावांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेती विकून मुलीचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणारे भगवंत कांबळे यांच्याकडे अवघी दोन एकर शेत जमीन आहे. मात्र, आपल्या मुलीला शिकवून डॉक्टर करण्याचा ध्यास मनी बाळगून भगवंत ने एक एकर जमीन विकली. मुलीनेही बापाच्या स्वप्नासाठी मेहनत घेतली व तिचा अकोला येथे एमबीबीएस साठी नंबर लागला मुलांच्या भविष्यासाठी एका आदर्श दलित भावंडांची ही कहाणी समाजासाठी प्रेरणादायी आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.