लता दीदींच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुख खान थुंकला? काहीजण म्हणाले हि तर प्रार्थनेची पद्धत!

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी थुंकल्याचा आरोप बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानवर (Shahrukh Khan) करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लता दीदींच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुख खान थुंकला? काहीजण म्हणाले हि तर प्रार्थनेची पद्धत!
लता दीदींच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुख खान थुंकला? काहीजण म्हणाले हि तर प्रार्थनेची पद्धत! SaamTvNews
Published On

मुंबई : गाणसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आज अनंतात विलीन झाल्या. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्ग्ज मंडळी उपस्थित होती. लता दीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी थुंकल्याचा आरोप बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानवर (Shahrukh Khan) करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान मास्क काढून थुंकताना दिसत आहे, असा दावा काही लोकांनी केला आहे. काही लोकांनी शाहरुख खानला प्रश्न विचारला आहे कि, इस्लामनुसार ही अंतिम दर्शन घेण्याची प्रक्रिया आहे का? की शारुखने जाणीवपूर्वक असे केले आहे.

हार्दिक नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर लिहिले की, मुस्लिमांचा थुंकीशी ही काय आसक्ती आहे? शाहरुख खान थुंकत होता का?" यासोबतच त्याने हा व्हिडिओही शेअर केला आहे. तथापि, याला उत्तर देताना, जिथे काही लोकांनी ते दुआ वाचत असल्याचे सांगितले तर काहींनी सांगितले की हा दुआ 'फुंकण्याचा' एक प्रकार आहे. काहींनी असेही म्हटले की मास्क काढल्यानंतर हे नैसर्गिकरित्या होऊ शकते. साम टीव्ही या दाव्याला दुजोरा देत नाही, पण लोक असे प्रश्न विचारत आहेत.

एका व्यक्तीने लिहिले की, ‘अंतिम मुस्लिम तस्लीम’ ची ही पद्धत आहे. ज्यामध्ये एक वाक्य उच्चारले जाते आणि आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते.

साहिल नावाच्या एका व्यक्तीने ट्विट करत म्हटले आहे, “ही एक प्रकारची हवा आहे, जी तोंडातून एखाद्या व्यक्तीकडे जाते. तसेच दुआ पठण केले जाते. या अनुषंगाने ती व्यक्ती जिथे असेल तिथे सुखी राहो, अशी प्रार्थना केली जाते. हे थुंकणे नाही, द्वेष पसरवू नका."

'स्वरा सम्राज्ञी', 'सरस्वती पुत्री', 'स्वर कोकिळा' यांसारख्या असंख्य उपमा आणि अलंकारांनी सन्मानित झालेल्या गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी (६ फेब्रुवारी २०२२) निधन झाले. 'गायत्री मंत्र' आणि ‘सौगंध मुझे इस मिट्टी का’ ही त्यांची शेवटची रेकॉर्ड केलेली गाणी. दरवेळेप्रमाणेच त्यांनी हा मंत्र आणि गाणे मनापासून गायले. लता मंगेशकर वयाच्या पाचव्या वर्षापासून गातात, पण व्यावसायिक गायिका म्हणून त्यांनी 'नाचू या गडे, खेलू सारी मनी हौस भारी' हे गाणे गायले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com