पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी ओंकार कदम
महाराष्ट्र

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी

महाराष्ट्र शासनाने सातारा या ठिकाणी मंजूर केलेल्या जागेची पहाणी सहकार आणि पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली

ओंकार कदम

सातारा : महाराष्ट्र शासनाने सातारा या ठिकाणी मंजूर केलेल्या जागेची पहाणी सहकार आणि पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार आदी उपस्थित होते.

हे देखील पहा-

साताऱ्यातील कृष्णाखोरे विकास महामंडळाच्या जागेवर हे महाविद्यालय उभे राहणार असून, या बाबत आता मंजुरी आणि इतर तांत्रिक बाबजनची पूर्तता झाली असून तात्पुरत्या स्वरूपात यावर्षी इतर खासगी महाविद्यालयात या बाबतची प्रवेश प्रक्रिया करण्याचा विचार सुरू आहे. या जागेची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.  

पालकमंत्री श्री.बाळासाहेब पाटील म्हणाले की, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार आहे. सध्या शासकीय महाविद्यालय खासगी महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात आले आहे. पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा मानस असून, शासकीय महाविद्यालयाची इमारत काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी महाविद्यालय स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जमीन खरेदी-विक्रीचा नवा नियम, आता गुंठ्यांत जमीन घेण्यापूर्वी हे वाचाच, अन्यथा व्यवहार ठरेल बेकायदेशीर

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Hair care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात? स्ट्रेटनर-कर्लर न वापरता या ७ ट्रिक्स करा फॉलो; केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

Flight Ticket Rate : कोकणवासियांसाठी मोठी खूशखबर! आता विमानाने करा स्वस्त अन् मस्त प्रवास; पाहा काय आहेत तिकिटाचे दर

SCROLL FOR NEXT