Vegetables Price In Aurangabad Saam Tv
महाराष्ट्र

Vegetables Price Hike : महागाईने पिचलेल्या सर्वसामन्यांना आणखी एक झटका; सर्वच भाज्या महागल्या, मिरचीने गाठली शंभरी

Vegetables rates Hike in Beed : बीडमधील भाजीपाल्यांचे वाढलेले दर समोर आले आहेत.

विनोद जिरे

Beed News : महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका बसला आहे. भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. बीडमधील भाजीपाल्यांचे वाढलेले दर समोर आले आहेत.

बीडमध्ये सर्वच भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. स्वयंपाकात रोजच्या वापरात असलेल्या मिरचीच्या दरांनी तर शंभरी गाठली आहे. मिरची 100 रुपये किलो विकला जात आहे.

काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना भाव नाही म्हणून रस्त्यावर फेकलेल्या टोमॅटोचेही भाव वाढले आहे. टोमॅटो 50 रुपये किलो दराने विकला जात आहे. वांगी 80 रुपये किलो, दोडका 100 रुपये किलो, फुल गोबी 80 रुपये किलो दराने विकले जात आहे. (Latest Marathi News)

गवार 80 रुपये किलो, काकडी 60 रुपये किलो, कोथंबीर 10 रुपयाला छोटी जुडी, मेथी 15 रुपयाला छोटी जुडी, चुका 10 रुपये जुडी यासह दररोजच्या वापरातील सर्वच भाजीपाल्याच्या भावाने अचानक उसळी घेतली आहे. दरम्यान यामुळे सर्वसामान्यांना आता भाजीपाल्याच्या महागाईच्या झळा सोसाव्या लागणार असून खिशाला कात्री बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकचं पद रद्द; काय आहे कारण?

Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: आता फक्त २३ ऑक्टोबर रोजी मतदान संपेपर्यंत "ड्राय डे" घोषित

'डबल अटॅक'! हिवाळा ठरणार अत्यंत भयानक; अल नीनोच्या नव्या धोक्याने शास्त्रज्ञही चक्रावले, हवामानाचा धक्कादायक रिपोर्ट

SCROLL FOR NEXT