म्हैस दुधाच्या दरात मात्र कोणताही बदल नाही.
गोकुळकडून गाय दूध दरवाढ जाहीर
नवीन दर २१ मेपासून लागू होणार
व्यावसायिक गॅस, पेट्रोल-डीझेल, सीएनजी दरवाढीचा चटका सोसला जात नाही, तोच आता दूध दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे. गोकूळकडून गायीच्या दुधाची दरवाढ करण्यात आली आहे. गोकूळ दूध संघाच्या प्रशासकीय मंडळाने हा निर्णय घेतला आहे. महागाईनं सर्वसामान्यांची होरपळ सुरू आहे. सीएनजीपासून पेट्रोल डीझेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. यावरून सर्वसामान्यांमध्ये संताप दिसून येत असतानाच, आता दूध दरवाढीने सर्वसामान्य पोळले आहेत.
गोकूळकडून गायीच्या दूधाची दरवाढ करण्यात आली आहे. गोकूळ दूधसंघाच्या प्रशासकीय मंडळाने हा निर्णय घेतला आहे. २१ मे पासून ही दरवाढ लागू होणार आहे. दूधाच्या विक्री दरात प्रतिलीटर २ रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, म्हशीच्या दूध दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. गॅस सिलेंडर, खाद्यतेल, भाजीपाल्यासह दैनंदिन वापराच्या वस्तुंच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तीन दिवसांपूर्वीच अमुल कंपनीने दुधाच्या दरात वाढ केली होती. प्रतिलीटर 2 रुपयांनी दुधाचे दर वाढले होते.
अमुलपाठोपाठ आता गोकुळ दुधाच्या किंमतीत देखील वाढ झाल्याची जाहीर करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर पुन्हा भार पडणार आहे. कोल्हापूर दूध उत्पादक संघाने पत्रक काढत दूध दरवाढ जाहीर केली आहे. कोल्हापूरातून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात वितरीत होणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथीन पॅकिंगमधील गाय दुधाच्या दरात वाढ होत असल्याचं पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.