Uday Samant Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्योगमंत्री उदय सामंतांचे बंधू काँग्रेसच्या वाटेवर? विजय वड्डेटीवारांची घेतली भेट

kiran samant : मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांच्या भेटीला गेले आहेत.

Bharat Jadhav

kiran samant Meet To Vijay Vadettiwar :

पक्षात नाराज असलेले उद्योग सामंतांचे बंधू किरण सामंत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. किरण सामंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वड्डेटीवार यांच्या भेटीला गेले आहेत. किरण सामंत यांनी वड्डेवटीवार यांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest News)

किरण सामंत हे मागील अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा असून नाराज किरण सामंत वड्डेटीवार यांच्या भेटीला आल्याने विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील खासदारकीसाठी किरण सामंत हे इच्छुक आहेत. मात्र राणे पितापुत्रांचा त्या जागेवरील दाव्याने सामंतविरूद्ध राणे अशी रस्सीखेच सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपही आहे इच्छुक

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात (Constituency) भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहे. शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर भाजप सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

स्टेट्समुळे रंगली चर्चा

किरण सामंत यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत आपली इच्छा व्यक्त केली होती. किरण सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं की, 'मी किरण सामंत, रोकेगा कौन ?' किरण सामंत यांच्या स्टेटसमुळे या जागेवरचा ट्विस्ट आणखी वाढला आहे. काही दिवसांपूर्वी मशाल चिन्हाचे स्टेट्स ठेऊन किरण सामंत यांनी राजकीय गोंधळ निर्माण केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

Pista Kulfi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी पिस्ता कुल्फी रेसिपी

WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT