Indurikar Maharaj Video: कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. बीडमध्ये एका किर्तनात बोलताना म्हणाले, तिने 3 गाणे वाजवून तीन लाख घेतले आणि आम्ही पाच हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात काय खरंय त्यांचं, असं वक्तव्य निवृत्ती महाराजांनी केले आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे निवत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी किर्तनकारांच्या प्रश्नांवर बोलताना निवृत्ती महाराज इंदुरीकर नाव न घेता गौतमी पाटीलवर निशाणा साधला.
दरम्यान, याच परिसारात काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमध्ये गोंधळ उडाला होता. यावेळी धावपळ उडली होती आणि त्यात काही लोक जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा संदर्भ देत निवृत्ती महाराजांनी हे वक्तव्य केले. (Latest Marathi News)
निवृत्ती महाराज म्हणाले, तिने 3 गाणे वाजवून तीन लाख घेतले, तिच्या कार्यक्रमात मारामारी झाली, काहीचे गुडघे फुटले पण तिच्याविषयी काही बोललं जात नाही. आम्ही पाच हजार जास्त मागितले तर लोक म्हणतता काय खरंय त्यांचं, सगळी जनता लुटली असे म्हणतात असे निवृत्ती महाराज म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.