Shruti Vilas Kadam
उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.
नाश्ता कधीही स्किप करू नका. ओट्स, उपमा, पोहे, उकडलेली अंडी, फळे किंवा स्प्राऊट्स यांसारखा हलका पण पौष्टिक नाश्ता घ्या. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते.
दुपारच्या जेवणाआधी भूक लागल्यास 1 फळ, नारळ पाणी किंवा मूठभर सुकामेवा घ्या. यामुळे ओव्हरईटिंग टाळता येते.
चपाती/भात मर्यादित प्रमाणात घ्या आणि त्यासोबत भाजी, डाळ, कोशिंबीर, दही यांचा समावेश करा. तळलेले आणि जास्त तेलकट पदार्थ टाळा.
संध्याकाळी चहा-भाजीऐवजी ग्रीन टी, सूप किंवा भाजलेले चणे घ्या. हे वजन वाढू देत नाही.
रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान 2–3 तास आधी घ्या. सूप, भाजी, चपाती किंवा सलाड यांसारखे हलके पदार्थ योग्य ठरतात.
दिवसभर भरपूर पाणी प्या, रोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा आणि 7–8 तासांची झोप घ्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.