kailas pawar  
महाराष्ट्र

जवान कैलास पवार यांना सियाचिनमध्ये वीरमरण; उद्या गावात अंत्यविधी

संजय जाधव

बुलढाणा : सियाचीन येथे सीमेवर कार्यरत असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील सैनिकाचा soldier दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कैलास भारत पवार kailas pawar असे या जवानाचे नाव आहे. कैलास यांचा सैन्यातील सेवेचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने ते घरी परतत असताना बर्फाळ डोंगरावरून त्यांचा पाय घसरल्याने ते कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

चिखली येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी कैलास भारत पवार हे दाेन ऑगस्ट 2020 पासून सैन्य दलात आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. त्यांची सियाचीनमधील एक वर्षाचा कार्यकाल एक ऑगस्टला संपला. आता ते सहा महिन्यांच्या सुटीवर घरी येणार होते. परंतु त्यापुर्वीच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

सियाचिन ग्लेशियर पर्यंत पाठीवर सामानाचे ओझे घेऊन जाणे आणि उतरून परत येणे हा प्रवास जवानांना पायीच करावा लागतो. तो तिथंपर्यंत पोहचायला आणि तेथून खाली यायला प्रत्येकी चार दिवस लागतात. दरम्यान खाली उतरत असताना बर्फाळ डोंगरावरून कैलास यांचा पाय घसरला आणि ते कोसळले. सोबत असलेल्या जवानांनी शक्य तेवढे लवकर त्यांना उपचारासाठी लडाखच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

वीर जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवार, ता. ४ ऑगस्ट) चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात सकाळी 11 वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

SCROLL FOR NEXT