INDIAN RAILWAYS SHATABDI UPGRADE: MODERN FACILITIES FOR BETTER TRAVEL Saam Tv
महाराष्ट्र

Indian Railway : 'या' २ एक्सप्रेस वंदे भारतपेक्षा भारी, सीटपासून ते टॉयलेटपर्यंत भन्नाट सोयी-सुविधा, वाचा A टू Z माहिती

Indian Railways Shatabdi Train Upgrade : भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! शताब्दी आणि जन शताब्दी गाड्यांमध्ये आधुनिक सुविधा, अधिक आराम आणि सुरक्षा वाढवण्यासाठी मोठा कायापालट.

Alisha Khedekar

  • शताब्दी आणि जन शताब्दी गाड्यांचा कायापालट

  • USB चार्जिंग, LED आणि आधुनिक सुविधा

  • प्रवाशांच्या तक्रारींवर रेल्वेची कारवाई

  • सुरक्षा आणि स्वच्छतेत मोठी सुधारणा

  • लाखो प्रवाशांना होणार फायदा

आता तुम्ही वंदे भारतच्या आरामदायी प्रवासाला देखील विसराल. कारण भारतीय रेल्वेने देशभरातील प्रीमियम शताब्दी एक्सप्रेस आणि जन शताब्दी एक्सप्रेस सारख्या रेल्वेगाड्यांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमधील प्रवाशांना अधिक आरामदायी, स्वच्छ आणि आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने मोठा कायापालट करण्यात येणार आहे. दीर्घकाळापासून प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन प्रवासाचा दर्जा उंचावणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचं म्हटलं जात आहे.

रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेला स्पष्ट निर्देश दिले असून,रेल्वेच्या प्रत्येक रेकची सखोल तपासणी करून समस्या दूर करण्यासाठी ठराविक कालमर्यादेत कृती आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. या सुधारणा योजनेअंतर्गत गाड्यांतील आसनव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. नवीन अपहोल्स्ट्री, स्नॅक टेबल आणि प्रत्येक सीटमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याशिवाय, टॉयलेट देखील नव्या स्वरूपात तयार करण्यात येणार असून त्यामध्ये आधुनिक फिटिंग्ज, सुधारित ड्रेनेज सिस्टीम आणि उच्च दर्जाची स्वच्छता होईल हे निश्चित केले जाईल. प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी गाड्यांमधील धक्के कमी करण्यासाठी तांत्रिक सुधारणा, व्हॅस्टिब्यूल्स आणि उत्तम एलईडी लाईटिंगची सोय केली जाणार आहे. कोचच्या आतील भागालाही नवीन स्वरूप देण्यात येणार असून, फ्लोअरिंग आणि वॉल पॅनेल्स नव्याने लावले जाणार आहेत. तसेच रेल्वेमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. सूचना फलक, स्टेशनच्या नावांचे फलक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अधिक सक्षम डिजिटल माहिती प्रणाली (PAPIS) बसवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना माहिती सहज उपलब्ध होईल आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल.

या उपक्रमांतर्गत सुमारे २५ शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या सुधारणांमुळे प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि वंदे भारत व अमृत भारतसारख्या नव्या सेवांना पूरक वातावरण तयार होईल. या संपूर्ण प्रक्रियेमुळे दररोज लाखो प्रवासी अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT