Opposition parties demand cancellation of India vs Pakistan Asia Cup 2025 match in Parliament following terror attack tensions Saam Tv
महाराष्ट्र

भारत- पाकिस्तान मॅचवरून वाद पेटला, विरोधकांनी सरकारला संसदेत घेरलं

Parliament Debate On India vs Pakistan Asia Cup Match: 14 सप्टेंबरला होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतील भारत- पाकिस्तान मॅचवरून वाद पेटलाय. नेमकं प्रकरण काय? भारत- पाकिस्तान सामना होणार का नाही?

Suprim Maskar

सीमेवरील तणाव आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही महिन्यातच होणाऱ्या भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून देशात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलयं. विरोधकांनी पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या चार महिन्यानंतर होणाऱ्या सामन्याविरोधात आक्रमक भूमिका घेत, खेळातही पाकिस्तानवर बहिष्कार घालण्याची मागणी केलीय. तसचं भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरुन विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

आशिया चषक 2025 चं यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना रद्द करणं सहजशक्य का नाही याची कारण पाहूया...

भारत- पाक मॅच रद्द होणार?

भारतानं पाक संघाला खेळण्यास नकार दिला तर स्पर्धेत अडचणी

सामना रद्द करता येणार नाही कारण आशियाई क्रिकेट परिषदेकडून सामन्याचे आयोजन

सामना रद्द झाल्यास प्रसारण आणि महसुलावरही मोठा परिणाम

सामना रद्द झाल्यास प्रसारकांना 1475 कोटी रुपयांचा तोटा

याआधी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला होता. मात्र यावेळी आशिया कपसंदर्भात खेळांडूंकडून कोणतीच भूमिका घेण्यात आलेली नाही. मात्र केंद्रसरकारनं पहलगाम हल्ल्यामागे असणाऱ्या पाकिस्तानला सामन्यातून हद्दपार करून चांगलाच धडा शिकवायला हवा अशी मागणी जोर धरू लागलीय. आता केंद्रसरकार याबद्दल काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ कोणती?

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

Laxman Hake: अंगावर धावून आले आणि मारण्याचा प्रयत्न केला.." पाहा लक्ष्मण हाकेंसोबत नेमकं काय घडलं|VIDEO

Manoj Jarange Patil Protest Live Updates: मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी सुरू

Monday Horoscope : गौरी-गणपतीत उजळणार नशीब, ५ राशींच्या हाती येईल अचानक पैसा

SCROLL FOR NEXT