New Vande Bharat Sleeper Train News Saam Tv
महाराष्ट्र

Vande Bharat Sleeper Train : आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार, कोणता असेल मार्ग, वाचा सविस्तर

New Vande Bharat Sleeper Train News : मार्च महिन्यात देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावणार आहे. २०२६ पर्यंत एकूण १२ स्लीपर ट्रेन चालवण्याचे रेल्वेचे लक्ष्य आहे. बोल्स्टरलेस कोच, व्हॅक्यूम टॉयलेट आणि लक्झरी सुविधांसह प्रवाशांना मिळणार खास अनुभव.

Alisha Khedekar

  • मार्चमध्ये देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार

  • दिल्ली-हावडा, दिल्ली-मुंबई किंवा चेन्नई-बेंगळुरू-मुंबई मार्गावर धावण्याची शक्यता

  • २०२६ पर्यंत १२ स्लीपर ट्रेन सुरू करण्याचे रेल्वेचे लक्ष्य

  • प्रवाशांना लक्झरी अनुभव मिळणार

काही महिन्यांपूर्वी वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचे नवीन रूप आपल्याला पाहायला मिळाले. या ट्रेनच्या यशस्वी प्रयोगानंतर आणखी एक वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार असल्याचे म्हटले जात आहे. ही दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन मार्च महिन्यात धावणार आहे. या ट्रेनमुळे नागरिकांचा प्रवास सुखरूप होणार असून २०२६ पर्यंत एकूण १२ वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचे लक्ष्य असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले.

रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर मार्चमध्ये रुळावर येईल. तिचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही, परंतु हिंदुस्थानच्या रिपोर्टनुसार दिल्ली-हावडा, दिल्ली-मुंबई किंवा चेन्नई-बेंगळुरू-मुंबई दरम्यान ही ट्रेन चालवली जाईल.

तसेच २०२६ पर्यंत एकूण १२ वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचे लक्ष्य आहे. प्रत्येक ट्रेन तांत्रिकदृष्ट्या आणि सोयीस्करपणे आधीच्या ट्रेनपेक्षा अपग्रेड केली जाईल. प्रवाशांना विमान किंवा फाईव्ह स्टार हॉटेलसारखा अनुभव देण्यासाठी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ने वंदे भारत स्लीपरची रचना केली आहे.

या स्लीपर ट्रेनमध्ये पहिल्यांदाच बोल्स्टरलेस कोच वापरण्यात आले आहेत. यामुळे ट्रेन कितीही वेगात असली तरी टेबलावरून चहाचा कप देखील पडू शकत नाही. तसेच विमानात ज्याप्रमाणे बायो-व्हॅक्यूम टॉयलेट आणि टच-फ्री नळ बसवण्यात आले आहेत, त्याचप्रकारे नवीन डिझाइन केलेल्या, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये स्मार्ट सेन्सर लाईट्स, व्हॅक्यूम टॉयलेट, बोल्स्टरलेस कोच आणि ब्रँडेड केटरिंग असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये येऊ शकतात २००० रुपये; ही एक चूक केली तर पैसे अडकणार

Healthy Breakfast Option: चहा-बिस्किटं की पोहे? नाश्त्यासाठी कोणता पर्याय बेस्ट, जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: पुण्यात आज लाऊड स्पीकर विरोधी मोर्चा

Haunted Fort : 'या' किल्ल्याचं नाव ऐकताच भीतीने थरथर कापतात लोक, बाहेरून पाहूनच धडकी भरेल

Chocolate Balls Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली? घरच्या घरी बनवा झटपट आणि स्वादिष्ट 'चॉकलेट बॉल्स';वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT