Eknath Shinde, Bacchu Kadu Saam Tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली; बच्चू कडूंनी दिली माहिती

मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा १५ सप्टेंबर रोजी पार पडेल असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा (Eknath Shinde) मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील ९ आमदार आणि भाजपमधील ९ आमदार अशा १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा लवकरच पार पडणार असल्याची माहिती अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा १५ सप्टेंबर रोजी पार पडेल असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे. (Bacchu Kadu News Today)

विस्तार होईल तेव्हा बच्चू कडू मंत्री राहिल असा शब्दही आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी बच्चू कडू नागपूरच्या विधानभवनात दाखल झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Bacchu Kadu Latest News)

काय म्हणाले बच्चू कडू?

नाराज होतो म्हणुन आलो नाही, मी थोडं कामानिमित्त बाहेर होतो, त्यामुळे येऊ शकलो नाही. नाराज आहे म्हणून न येण्याचं काही कारण नाही. जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा होईल तेव्हा बच्चू कडू मंत्री राहिल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिला आहे. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

मला वाटतं मी मागे पण सांगितलं होतं की, मी व्यक्तीगत हितासाठी नाराज होणार नाही.आमचे काही महत्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर आमची लढाई चालू राहिल. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन

Maharashtra Rainfall: पुढचे ५ दिवस तुफान पावसाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्त्यावरील वाहतूक बंद, पर्यटनस्थळांवर प्रवेश बंदी; काय आहे कारण?

पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत भेंडीची भजी; हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

Badlapur: बदलापूर हादरले! उल्हास नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT