परभणी: पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या पाणीसाठ्यात सतत वाढ होत असल्यामुळे कोणत्याही क्षणी पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पुर्णा पाटबंधारे विभागाने दिली असून नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरण क्षेत्राच्या उर्ध्व भागात पर्जन्यमान सुरू असल्याने येलदरी तसेच सिद्धेश्वर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा येवा वाढत आहे.
सदरील परिस्थिती पाहता धरणक्षेत्रात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येलदरी व सिद्धेश्वर धरणातून कोणत्याही क्षणी पूर्ण पात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते. येलदरी सह परिसरात ता. १५ रोजी दुपारी बारा वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू असून येलदरीसह सिद्धेश्वर धरणात पाण्याचा येवा वाढत आहे.त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता लक्ष्यात घेऊन पाटबंधारे विभागाने पूर्णा नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
तालुक्यात तब्बल २२ दिवसाच्या खंडानंतर पाऊस पडत असल्यामुळे पावसाअभावी वाळून जात असलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कापूस,हळद आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. यापावसामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकर्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातही ता.१७ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजल्यापासून येलदरी धरणाच्यापाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे येलदरी व त्याखालील सिद्धेश्वर धरणात पाण्याची आवक वाढत आहे. येलदरी धरणाच्या एकूण क्षमतेपैकी ७३५ दलघमी एकूण पाणी साठा उपलब्ध झाला असून त्याची टक्केवारी ७५. ३६ % एवढी आहे तर सिद्धेश्वर धरण ८५ टक्के भरले आहे.
पुढील तीन दिवस असाच सतत पाऊस पडत राहिल्यास येलदरी सिद्धेश्वर धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरू शकते त्या अनुषंगाने पाटबंधारे विभाग सतर्क झाला असून विभागाने परिपत्रक काढून नदी काठच्या गावांना सतर्क सतर्कतेचा इशारा दिला असून नदीपात्रात कोणीही आपली वाहने जनावरे सोडू नये किंवा कोणतीही जीवित वा वित्तहानी होणार नाही याबाबत सर्व पूर्णा प्रणव क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.