राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजकीय भेटीगाठींना उधाण आल्याचे दिसत आहे. आज सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेतली, तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची भेट घेतली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. या सर्व भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Increased meetings with political leaders)
संजय राऊत- उद्धव ठाकरे भेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटायला आलो होतो , आज केवळ पक्षसंघटन यावर आमची चर्चा झाली. राहुल गांधींच्या भेटीसदर्भातला तपशील त्याच दिवशी दिला. याशिवाय संघटनात्मक विषयावर बरीच चर्चा झाली. तसेच, संघटना वाढीसाठी आवश्यक त्यासंदर्भात, नेत्यांसंदर्भात, नवीन उपक्रमासंदर्भात, मी जेव्हा भेटतो तेव्हा पक्ष संघटना आदी विषयांवर बोलतो.
यासोबतच मराठा आरक्षणासंदर्भात थोडीफार चर्चा केली, मराठा आरक्षणासाठी माहिती घटनात्मक दृष्ट्या काय आहे आणि काय करायला पाहिजे, या संदर्भात मंत्री अशोक चव्हाण समितीचे प्रमुख ते आज सगळे पक्षाच्या नेत्यांना लोकांना माहिती देणार आहेत, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नितेश राणे- भगतसिंग कोश्यारी भेट
हिंदू सणांवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधाबाबत नितेश राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. हिंदू सणांच्या वेळीच सरकारला कोरोनाची आठवण होते. बीईएसटीचा कार्यक्रमावेळी, मेट्रोच्या कार्यक्रमात झालेली गर्दी मुख्यमंत्र्यांना दिसत नाही. सरकारी पार्ट्याच्या ठिकाणी कोरोना दिसत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्पयातील राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटनावेळी झालेली गर्दी दिसत नाही. पण आमचे सण आले की यांना कोरोना दिसतो, अशी टिका नितेश राणे यांनी केली आहे.
शरद पवार - बसवराज बोम्मई भेट
शरद पवार यांनी बसवराज बोम्मई यांची दोन दिवसांपुर्वी भेट घेतली. या भेटीत कृषी, सहकार आणि पाणी प्रश्न यांसह विकासाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अलमट्टीच्या पाण्याबाबतही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती. त्यामुळे या भेटीत प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगानेही चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.