Income Tax Raids On Film Production Houses saam tv
महाराष्ट्र

IT Raids Film Production Houses: चित्रपट निर्माते आयकरच्या रडारवर! विनोद भानुशाली, जयंतीलाल गाडा यांच्या कार्यालयांवर छापेमारी

Income Tax Raids On Film Production Houses : करचुकवेगिरीच्या आरोपाखाली हिंदी चित्रपट निर्माते विनोद भानुशाली यांच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सची छापेमारी सुरू आहे.

सुरज सावंत

Income Tax Raids Underway : करचुकवेगिरीच्या आरोपाखाली हिंदी चित्रपट निर्माते विनोद भानुशाली (Vinod Bhanushali) यांच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सची छापेमारी सुरू आहे. याशिवाय बॉलिवूडच्या इतर प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयावरही आयटी टीमने छापे टाकले आहेत. चित्रपट निर्माते जयंतीलाल गडा (Jayantilal Gada) यांच्या घरावरही छापेमारी करण्यात येत आहे. टाकण्यात येत असल्याची माहिती प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

जयंतीलाल गाडा यांच्या कार्यलयावर छापेमारी

मुंबईतील आयकर विभागाने बुधवारी बॉलिवूडमधील काही प्रमुख निर्मात्यांच्या घरी व कार्यालयाची झाडाझडती घेतली. एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेन स्टुडिओचे प्रवर्तक जयंतीलाल गाडा यांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर ही कारवाई घेण्यात आली.

जयंती लाल यांच्या स्टुडिओ आणि घरांमध्ये इन्कम टॅक्सने सर्च ऑपरेशन केले. आर्थिक अनियमितता आणि करचुकवेगिरीबाबत आयकर विभागाची ही छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

विनोद भानुशाली यांची झडती

यासोबतच विनोद भानुशाली या आणखी एका निर्मात्याच्या कार्यालय आणि निवासस्थानी आयकर विभागाने शोधमोहिम राबवली. भानुशाली याआधी देशातील आघाडीच्या संगीत आणि निर्मिती कंपनीशी संबंधित होते. काही काळापूर्वी त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार आयकर अधिकाऱ्याने विनोदच्या 'भानुशाली स्टुडिओ लिमिटेड', वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील हिट्स म्युझिक आणि भानुशालीच्या होम ऑफिसची झडती घेतली. (Income Tax Raids)

या दोघांवरही कर चुकवल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जयंतीलाल गाडा यांच्या प्रॅाडक्शन हाऊसने अनेक मोठे चित्रपट व मालिकांची निर्मिती केली आहे. नुकताच गाजलेला बहुचर्चित RRR या चित्रपटाची निर्मीतीही गाडा यांच्या पेन स्टुडिओ तर्फे करण्यात आली होती. यासह इतरही काही निर्माते आयकर विभागाच्या रडारवर आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नंदूरबारमधील स्कूल बस अपघातात मृत्यूचा आकडा वाढला

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

SCROLL FOR NEXT