Samruddhi Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात हसतं खेळतं कुटुंब क्षणार्धात संपलं, चिमुकलीसह तिघांचा मृत्यू, 5 जण जखमी

Accident News : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Ahmednagar News : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातात जालन्याचं हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत, तर 5 जण जखमी आहेत. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाला.

अपघातातील मृतांमध्ये पती, पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मृत जालना जिल्ह्यातील मंठा गावचे रहिवासी आहेत. संतोष अशोक राठोड (३५) त्यांची पत्नी वर्षा संतोष राठोड (२९) आणि मुलगी अवनी संतोष राठोड दीड वर्ष अशी मयतांची नावे आहे. (Accident News)

भावाच्या लग्नासाठी गेले होते गावी

संतोष राठोड भावाच्या लग्नासाठी जालना येथे मूळगावी आले होते. लग्न झाल्यानंतर मुंबईच्या विरार येथे परतत असताना हा अपघात झाला. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी झालेल्या अपघातात नवरदेव कृष्णा राठोड (२७) आणि त्याची पत्नी कोमल राठोड (१९) हे देखील जखमी झाले आहे. संतोषची आई बताबाई राठोड (६५) यांच्यावर उपचार सुरू आहे. (Maharashtra News)

मिळालेल्या माहितीनुसार जीपने टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की जीपच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मयतांचे शव शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

Raw Banana Curry Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा हिरव्या केळ्याची स्वादिष्ट करी, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

SCROLL FOR NEXT