Devendra Fadanvis Eknath Shinde Saamtv
महाराष्ट्र

Samruddhi Highway: शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते 'समृद्धी'च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण; ६०० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला

Samruddhi Mahamarg Second Phase : महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने आता नागपूर ते भरवीर (नाशिक) हे अंतर आता सहा तासांत पूर्ण करता येणार आहे.

Gangappa Pujari

Samruddhi Highway: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीमध्ये समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच शिर्डीमध्ये दाखल झाले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगरमधील कार्यक्रम आटोपून शिर्डीकडे प्रस्थान केलं. (Samrudhi Mahamarg News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्पाचे लोकार्पण झाले. शिर्डी ते इगतपुरी अशा 80 किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. चा फायदा मुंबई आणि आसपासच्या शहरातून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना या महामार्गाचा लाभ होणार असून 23 जिल्हे समृद्धी महामार्गाने जोडले जाणार आहेत.

701 किमी पैकी 600 किमीचा रस्ता प्रवासासाठी खुला झाला असून या महामार्गावरील वाहतूक आजपासून सुरू झाली आहे. तत्पुर्वी गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. (Latest Marathi News)

दरम्यान, या कार्यक्रमाआधी छत्रपती संभाजी नगरः छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शासन आपल्या दारी' या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT