Nandurar News दिनू गावित
महाराष्ट्र

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; एकाच रस्त्याचे आमदार आणि खासदारांनी केले भूमिपूजन

६ कि.मीच्या रस्त्याचे एका बाजूने भाजपच्या खासदार डॉ.हिना गावीत तर दुसऱ्या टोकाला भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी भूमिपूजन केले.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी ते सोमावल ते नर्मदानगर एमडीआर १ ते एमडीआर ४४ पर्यंत एकूण ६ कि.मीच्या रस्त्याचे एका बाजूने भाजपच्या खासदार डॉ.हिना गावीत (Heena Gavit) तर दुसऱ्या टोकाला भाजपचे आमदार राजेश पाडवी (Rajesh Padvi) यांनी भूमिपूजन केले. त्यामुळे भाजपचा (BJP) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

हे देखील पहा -

राज्यातील भाजपाच्या १०५ आमदारांना केंद्र शासनाच्या सेंट्रल रोड अँड इंन्फ्रास्ट्रक्चर फंड अर्थात सीआरआयएफ योजनेतून प्रत्येकी १० कोटी रुपयांचे रस्ते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी मंजूर केले आहेत. यात राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी ते सोमावल तर नर्मदानगर एम डी आर १ ते एम डी आर ४४ पर्यंत एकूण ६ कि.मीच्या या रस्त्याचाही समावेश आहे. यासाठी लागणारा निधी नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग देखील करण्यात आला आहे.

बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दबाव टाकून याबाबत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला 6 कि.मी.च्या रस्त्याचे सोमावल येथे आ.राजेश पाडवी यांनी भूमिपूजन केले. तर दुसऱ्या बाजूला नर्मदा नगर येथे खा.डॉ.हिना गावीत यांनी उद्घाटन केले. त्यामुळे भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

Farmer Success Story : लातूरच्या मातीत विदेशी फळ; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी घेताय एकरी १२ लाखाचे उत्पादन

SCROLL FOR NEXT