वेंगुर्ल्यात आघाडीत बिघाडी; काँग्रेसचा बंडखोर उमेदवार भाजपच्या मतांनी विजयी ! अनंत पाताडे
महाराष्ट्र

वेंगुर्ल्यात आघाडीत बिघाडी; काँग्रेसचा बंडखोर उमेदवार भाजपच्या मतांनी विजयी !

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार, सरकारमध्ये एकी असल्याचा अतोनात प्रयत्न करत असतानाच आता आघाडीतील बिघाडी दिसून आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपरिषदेच्या Vengurla Municipal Council उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्येच फुट पडल्याचे दिसून आले. गटनेते यांनी काढलेल्या व्हीपचा अनादर काँग्रेसच्या Congress तीन नगरसेवकांनी केल्याने महाविकास आघाडीच्या MVA उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे तसेच पर्यायाने भाजपच्या नगराध्यक्ष सहित काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांनी मतदान केल्याने काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार तसेच नारायण राणे Narayan Rane समर्थक शीतल आगचेकर Shital Aagchekar यांचा 10 मतांनी विजय झाला आहे. (In Vengurla, the Congress rebel candidate won by BJP votes)

हे देखील पहा -

महाविकास आघाडीचे गटनेते प्रकाश डिचोलकर यांनी बजावलेल्या व्हीपचा अनादर उपनगराध्यक्ष उमेदवारासहित तीन नगरसेवकांनी केल्याने त्याच्यांवर कारवाई वरिष्ठ करणार असल्याचे गटनेत्यांनी सांगितले असले तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे समर्थक असलेल्या उमेदवार शीतल आगचेकरांचा विजय झाल्याने जिल्ह्यात राणेंचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेत भाजपची सत्ता आहे नगराध्यक्ष भाजपचे असून एकूण 17 नगरसेवक आहेत यापैकी भाजप 7 काँग्रेस7 शिवसेना 2 अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. यापूर्वी राज्यात भाजप शिवसेना आघाडी असल्याने शिवसेनेच्या अस्मिता राऊळ उपनगराध्यक्ष होत्या त्यांनी राजीनामा दिल्याने आज विशेष सभा निवडणूक Election निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर Prashant Panvekar याच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

भाजपकडून BJP साक्षी पेडणेकर तर काँग्रेसकडून Congress विधाता सावंत व शीतल आगचेकर यांनी उमेदवारी भरली होती भाजप उमेदवार साक्षी पेडणेकर यांनी माघार घेतल्यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विधाता सावंत यांना 7 तर शीतल आगचेकर यांना 10 मते मिळाली तर एकजण तटस्थ राहिला मतदान हात उंचावून झाले आहे. राज्यात महाविकास आघाडी असतानाही व्हीपचा अनादर काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनी केल्याने महाविकास आघाडी उमेदवाराचा प्रभाव झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT