Municipal Elections Result saam tv
महाराष्ट्र

Municipal Elections Result: RSS च्या बालेकिल्ल्यात भाजपची लाट, १०० जागांकडे वाटचाल, काँग्रेसला किती जागा?

Municipal election results BJP: आरएसएसच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात भाजपने जोरदार कामगिरी केली आहे. भाजप १०० च्या पार गेल्याचं निकालांमधून समोर आलंय.

Surabhi Jayashree Jagdish

नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना याच शहरात झालीये. इतकंच नाही तर आणि गेल्या १०० वर्षांपासून नागपूर त्यांचं मुख्यालय आहे. त्यामुळे भाजपची याठिकाणी सत्ता यावी अशी आशा आहे.

शुक्रवारी जाहीर झालेल्या नागरी निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने लागले आहेत. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालांनुसार, १५१ पैकी ९४ वॉर्डमध्ये भाजप आघाडीवर आहे. आता फक्त १२९ जागांचे ट्रेंड जाहीर झाले आहेत. त्यामुळे, संपूर्ण १५१ जागांचे ट्रेंड जाहीर होईपर्यंत भाजप स्वतःहून शंभरी पार जाईल असे मानलं जातंय. दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आतापर्यंत फक्त दोन जागांवर आघाडी मिळालीये.

नागपूर हे शहर इतकं महत्त्वाचं आहे कारण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचं शहर आहे. याशिवाय नितीन गडकरी देखील याच शहरातील खासदार आहेत. आतापर्यंतच्या कलांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. दिसून याशिवाय काँग्रेस ३१ जागांच्या आघाडीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सध्याची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त एका जागेवर आघाडी मिळाली आहे. भाजपला मुंबईमध्येही चांगलं यश मिळत असल्याचं दिसून येतंय. यामुळे अनेक वर्षांपासून असलेली मुंबई महापालिकेवर असलेलं ठाकरे कुटुंबाचं वर्चस्व संपुष्टात येणार आहे.

मुंबई महापालिकेमध्ये सध्या भाजप ९३ जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदे यांची शिवसेना २४ जागांवर आघाडीवर आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ६४ जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेस फक्त १३ जागांवर आघाडीवर आहे. पुण्यातही नागपूरसारखीच परिस्थिती आहे. भाजप युती आतापर्यंत ४७ जागांवर आघाडीवर आहे, तर शरद पवार आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे फक्त १५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला फक्त ४ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. याठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना फक्त एका जागेवर आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election Result: भिंवडी महापालिकेत कोणाचं वर्चस्व? वाचा विजयी उमेदवारांची यादी

Cucumber Benefits: उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यात खा काकडी, आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra Elections Result Live Update: अमरावतीत बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने खाते उघडले

अचानक रात्रीच्या वेळेस का ओरडू लागतात कावळे?

Ladli Behna Yojana: लाडकीच्या खात्यात ३२वा हप्ता जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला ₹१५०० आले का?

SCROLL FOR NEXT