पैठणमध्ये ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून स्वीकारला हिंदू धर्म!  माधव सावरगावे
महाराष्ट्र

पैठणमध्ये ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून स्वीकारला हिंदू धर्म!

ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : पैठणच्या एकनाथ महाराज मंदिरात जालना जिल्ह्यातील मंठा इथल्या १२ कुटुंबातील ५३ महिला-पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्विकारल्याचं समोर आलंय. धर्मजागरण विभाग आणि नाथवंशज यांच्या उपस्थितीत हा घरवापसी सोहळा पार पडला. ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय. पैठणच्या वेदशास्त्र संपन्न पंडितांनी हिंदुधर्म शास्रानुसार सदर धर्मविधीचे पौरोहित्य केले.

हे देखील पहा :

याबाबत पैठण (Paithan) ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश कमलाकर शिवपुरी यांनी सांगितले की, 'जालना जिल्ह्यातील मंठा येथील १२ कुटुंबातील ५३ ख्रिश्चन महिला पुरुषांनी पुन्हा हिंदु धर्मात येण्याची ईच्छा व्यक्त केली होती. ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू (Hindu) धर्मवापसी करता येईल का ? अशी विचारणा झाल्यावर पैठणच्या ब्राह्मण सभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्याने धार्मिक विधी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नाथमंदिरात शांतीब्रम्ह नाथमहाराजांच्या समाधीसमोर विधीवत धर्मवापसी सोहळा पार पडला.

यावेळी संत एकनाथ महाराज यांचे १४ वे व १५ वे वंशज यांच्यासह पैठणचे वेदशास्त्र संपन्न ब्रम्हवृंदांची ऊपस्थीती होती. असेही अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी स्पष्ट केले.  मंठा (Mantha) तालुक्यातील आणखी २२ ख्रिस्ती कुटुंबातील जवळपास ६५ महिला पुरुष ख्रिश्चन धर्माचा त्याग करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. ५ जानेवारी रोजी धार्मिक मुहुर्तावर पैठण येथील नाथमंदिरातच या धर्मांतर (Conversion) विधीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण सभेच्या पुढाकाराने ही धर्मवापसी केली जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लाखनी तालुक्यात सालेभाटा-परसोडी रस्त्याची दुरावस्था

Malshej Ghat: माळशेज घाटात रस्ता खचला, वाहतूक पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Sreelekha Mitra: पंतप्रधान मोदींचा अवमान? त्या कार्टूनमुळे अभिनेत्रीविरोधात तक्रार; काय आहे संपूर्ण प्रकरण?

लठ्ठपणा आणि मधुमेह कमी करण्यासाठी करा घरगुती सोपे उपाय

ITR Filing Deadline : उरले शेवटचे 4 दिवस! ITR भरताना 'या' 7 चुका टाळा, नाहीतर बसू शकतो मोठा दंड

SCROLL FOR NEXT