Malegaon: मालेगावात दुमजली इमारत पत्त्यासारखी कोसळली Saam Tv
महाराष्ट्र

Malegaon: मालेगावात दुमजली इमारत पत्त्यासारखी कोसळली

मालेगावामध्ये (Malegaon) टिळक रोडवर एका प्रचंड रहदारीच्या गजबजल्याच्या परिसरामध्ये दुमजली इमारत पत्त्यासारखी कोसळली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: मालेगावामध्ये (Malegaon) टिळक रोडवर एका प्रचंड रहदारीच्या गजबजल्याच्या परिसरामध्ये दुमजली इमारत (Building) पत्त्यासारखी कोसळली (Collapsed) आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. इमारत कोसळल्याच्या घटनेमुळे या परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाला (administration) या घटनेची माहिती देण्यात आल्यावर घटनास्थळी प्रशासन अधिकारी पोहोचले आहेत. (In Malegaon two storey building collapsed)

हे देखील पहा-

अग्निशमन दल (Fire brigade) आणि महापालिकेचे (Municipal Corporation) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मलबा हटविण्याचे कार्य सुरु केले आहेत. ही इमारत खूप जुनी असून ती धोकादायक निर्माण झाली होती. महापालिका प्रशासनाने नोटीस देऊन इमारत रिकामी करविली होती. त्यामुळे हा मोठा अनर्थ टळला आहे. ही इमारत कोसळण्याच्या काही सेकंदा अगोदर २ महिला आणि काही जण या इमारती जवळून निघाले होते.

या घटनेमध्ये नशीब बलवत्तर असल्याने काहीजण वाचले आहेत. ही इमारत कोसळण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. इमारत कोसळल्याने परिसरामध्ये नागरिकांची धांदल उडाली होती. लोक आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

SCROLL FOR NEXT