Raigad Crime News, Raigad latest marathi news Saam tv
महाराष्ट्र

महाड हादरलं! पती-पत्नीच्या भांडणातून सहा मुलांची हत्या

या घटनेत सहाही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड - पती पत्नीच्या भांडणातून एका महिलेने ६ मुलांना विहिरीत ढकलून हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना महाड तालुक्यातील बोरगाव येथे घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सहाही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे. (Raigad latest marathi news)

पती पत्नीच्या या भांडणात रोशनी (10 वर्षे), करिष्मा (8 वर्षे) , रेश्मा (5 वर्षे) , विद्या (4 वर्षे) , शिवराज (3 वर्षे), राधा (3.5 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे देखील पाहा -

मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला चिखुरी साहनी हा पत्नी आणि सहा मुलांसोबत महाड तालुक्यातील शेलटोली येथे राहत होता. चिखुरी हा बिगारी काम करायचा. पत्नी रुणा ही गृहिणी होती. सोमवारी सकाळच्या सुमारास काही कारणामुळे या दोघांचे भांडण झाले. आणि याच रागाच्या भरात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या महिलेने तिच्या सहाही मुलांना बोरगावजवळील एका शेतातील विहिरीत फेकून दिले.

त्यानंतर महिलेने रात्री आठ वाजताच्या सुमारास महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात घटनेची कबुली दिली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानंतर अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि पत्नी यांना ताब्यात घेतले असून पुढील तपस पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

karishma kapoor Children: करिश्मा कपूरच्या घरातील वाद चव्हाट्यावर; ३००० कोटींच्या वादात संजय कपूरच्या बहीणीची एन्ट्री

Torna Fort History: ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध, भव्य वास्तुकला आणि नैसर्गिक आकर्षण, तोरणा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Maharashtra Live News Update: सरकारचा जीआर कोर्टात टिकणार नाही - मराठा नेते प्रविण गायकवाड

Tharala Tar Mag : सायलीच्या आयुष्यात पुन्हा येणार 'प्रिया' नावाचे वादळ, मालिकेत पुढे काय घडणार? पाहा VIDEO

Nepal Protest : नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्रातील १५० जण, उपमुख्यमंत्र्यांनी फोन करून दिला दिलासा

SCROLL FOR NEXT