Gujrat News Saam TV
महाराष्ट्र

Gujarat News: उलट्या काळजाची... ३ महिन्यांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं; तिचं काळीज चिरलं नाही का?

उंचीवरून खाली पडल्याने चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झालाय.

साम टिव्ही ब्युरो

Gujarat News:गुजरातमध्ये मातृत्वाला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका महिलेने पोटच्या मुलीचा जीव घेतला आहे. स्वत:च्या तीन महिन्यांच्या मुलीला नराधम आईने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले आहे. एवढ्या उंचीवरून खाली पडल्याने चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झालाय. (Latest Gujrat Crime News)

समोर आलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या नाडियाद येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. यात मृत पावलेल्या मुलीचं नाव अमरीनबानू असं आहे. अमरीन जन्मापासूनच फार अजारी असायची. त्यामुळे तिला घेऊन १४ डिसेंबर रोजी तिची आई फरजानबानू रुग्णालयात दाखल झाली होती. मुलीवर उपचार सुरू होते. यासाठी खूप खर्च येत होता. तसेच चिमुकलीला आजरपणाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे १ जानेवारी रोजी तिच्या आईने तिची हत्या केली.

मुलगी हरवल्याचा रचला कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरजानबानूने मुलीची हत्या केल्यावर कोणालाही याचा संशय येऊनये यासाठी मुलगी हरवल्याचा दावा केला. रुग्णालयातून मुलगी हरवली आहे असे तिने तिच्या पतीला सांगितले. आपली मुलगी हरवल्याने वडिलांनी सर्वत्र तिचा शोध घेतला. मात्र तिचा शोध काही लागला नाही.

रुग्णालयात देखील चिमुकलीची शोधाशोध सुरू झाली. यावेळी जमिनीवर खाली एक लहान मुलगी पडली असल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहिले असता ही मुलगी फरजानबानू यांचीच असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी मुलगी नेमकी खाली कशी पडली याचा शोध घेण्यास सुरूवात केली. यावेळी हॉस्पिटलमधील सीसीव्ही फूटेज तपासण्यात आले. यात फरजानबानूने स्वत: आपल्या मुलीला खाली फेकल्याचे दिसत आहे.

यासाठी घेतला मुलीचा जीव

या बाबत फरजानबानूने देखील स्वत: आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपली मुलगी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारी पडत होती. तिला होणारा त्रास मला बघवत नव्हता. त्यामुळे या त्रासातून मी तिला कायमचं मुक्त केलं आहे. असे फरजानबानूने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT