Pramod Sawant  SaamTvNews
महाराष्ट्र

गोव्यात भाजपच्या जागाच नव्हे तर मतांची टक्केवारीही वाढली - सावंत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोवा : गोवा विधानसभा (Goa Election 2022) निवडणुकीत भाजपने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दणदणीत विजय प्राप्त केला. देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) गोवा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी होती. गोवा (Goa) निवडणुकीत २० जागा मिळवत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्र गोमंतक पक्षाने देखील भाजपला पाठिंबा जाहीर केला असून पाठिंब्याचे पत्रही दिले आहे. त्यामुळे गोव्यात लवकरच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होईल.

हे देखील पहा :

निवडणुकीतील विजयानंतर भाजपने (BJP) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी प्रसार माध्यमांशी सवांद साधला. सावंत म्हणाले, या निवडणुकीत भाजपच्या २० जागा निवडून आल्या आहेत. या विजयाबद्दल जनतेचे मनापासून आभार मानतो. या विजयाचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) जाते. अनेक जण भाजपचे सरकार येणे मुश्किल असल्याचे सांगत होते. मात्र, आम्हाला विजयाचा विश्वास होता. मोदींच्या डबल इंजिन सरकारचे काम शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेण्याचे काम केले यामुळे त्याचा आम्हाला फायदा झाला.

निवडणुकीच्या अगदी पहिल्या दिवसापासून आम्हाला माध्यमांनी सहकार्य केले. जेव्हा जेव्हा आमचे राष्ट्रीय नेते गोव्यात आले तेव्हा तेव्हा माध्यमांनी गावागावात जाऊन कव्हरेज केले आहे. २०१२ नंतर पहिल्यांदाच कोणत्याही युतीविना आम्हाला २० जागा मिळाल्या आहेत. त्यावेळी युती करून आम्हाला २१ जागा मिळाल्या आता कोणत्याही युतीविना आम्ही २० जागा मिळवल्या आहेत.

केवळ जागाच वाढल्या नसून भाजपच्या मतांची टक्केवारी देखील वाढल्याचे प्रमोद सावंत म्हणाले. २०१७ विधानसभा निवडणुकीत आमची एकूण मतांची टक्केवारी ३२% होती. यावेळी ती ३४.३०% झाली आहे. त्यामुळे पक्षाचा जनाधार गोव्यात वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे मी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो. पक्षाच्या धोरणानुसार आम्ही सत्ता स्थापन करणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT