Breaking News: 'या' 4 जिल्ह्यात शाळांना कुलूपचं ! Saam Tv
महाराष्ट्र

Breaking News: 'या' 4 जिल्ह्यात शाळांना कुलूपचं !

राज्यभरातील शाळा १ डिसेंबर पासून म्हणजेच उद्यापासून सुरु होत आहेत. मात्र, कोरोनाच्या नव्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : राज्यभरातील शाळा १ डिसेंबर पासून म्हणजेच उद्यापासून सुरु होत आहेत. मात्र, कोरोनाच्या नव्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल सांगितले होते की शाळा १ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे १ डिसेंबर पासून राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे आणि शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खालील मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. परंतु राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय तेथील प्रशासनाने तूर्तास लांबणीवर टाकला आहे.

हे देखील पहा-

1) मुंबई महापालिकेचा निर्णय!; 'या' तारखेपासून सुरु होणार शाळा;

जगभरातील सर्वात जास्त प्रवासी ज्या मुंबईमध्ये येतात तिथल्या शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने राखून ठेवले होता. त्यावर आता निर्णय झाला आहे. मुंबईतील शाळा १ डिसेंबरपासून नाही तर १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. १ ते ७ वी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबर नंतरच सुरु करण्याचा निर्णय घेणयात आला आहे.

2) पुण्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर;

आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या बैठकीत पुण्याच्या शाळांबाबत निर्णय झाला आहे. या बैठकीत पुण्याच्या शाळा 15 डिसेंबरपर्यंत शाळा सुरु न करण्याचा निर्णय झाला आहे. तर, 15 डिसेंबरला पुन्हा आढावा घेऊन शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

3) नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय ढकलला पुढे;

नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. नाशिक महापालिका आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल असे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे. दक्षिण आप्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हायरसने संपुर्ण जगाची चिंता वाढवली आहे. त्याच अनुषंगाने राज्य सरकारने काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.

4) औरंगाबाद शहरातील शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार नाहीत;

औरंगाबाद शहरातील शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार नाहीत. त्यामुळे औरंगाबाद शहरातील शाळा या १० डिसेंबरनंतर आढावा घेऊन त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. शहरातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

Maharashtra Live News Update : 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

मोठी बातमी! रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली, पाकिस्तानची बोट असण्याची शक्यता

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

SCROLL FOR NEXT